दिवसांमागुन दिवस असेच गेले आणि पुन्हा रविवारचा दिवस उजाडला. दुपारच्या वेळी सेलेनाला तिच्या घरी हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर मॅगझीन वाचत-वाचत तशीच पोटावरच ठेवून डुलकी लागलेली. अलिशा तिच्यासाठी किचनमध्ये गरमागरम कॉफी बनवत होती. ती सेलेनाला उठवून तिला कॉफी देणार.. इतकयात फर्नांडिस आत चालत आला. आणि सेलेनाला उठवत म्हणाला -
Hey Selena, झोप लागली का तुला अशीच? - फर्नांडिस
सेलेना झोपेतून जागी झाली आणि तिकडून अलिशा किचनमधून कॉफीचे कप घेऊन बाहेर आली.Hey Farnandis! - सेलेना
Hey, तू इथे कसा काय अचानकच? - अलिशा
Oh.. hello Alisha, तू पण आहेस का इथे..
काही नाही मी सहजच आलो फिरत.. जॉर्ज कुठेय? - फर्नांडिसजॉर्ज गेला निघून लगेचच.. - अलिशा
Oh okay, थांबला नाही जास्त दिवस? - फर्नांडिस
त्याला भरपूर कामे होती ना.. - अलिशा
Ohh yes.. ते ही बरोबर आहे - फर्नांडिस
मला वाटले नव्हते तू सुद्धा असशील सेलेनाच्या घरी - फर्नांडिस
Oh.. I’m really sorry!! जर तुला सेलेनाशी एकांतात बोलायचे असेल तर मी जाते. काही प्रॉब्लेम नाही.. - अलिशा बाहेर जात म्हणाली.
अरे अरे.. तसं नाही.. मी असं सहजच बोललो. - फर्नांडिस
तू कुठे चाललीस आता लगेच? तू चहा घेणार की कॉफी? - सेलेना अलिशाला तिथेच थांबवत आणि फर्नांडिस ला विचारात म्हणाली
No, Thank You!
सेलेना, मी इथे तुला जे काही सांगायला आलोय.. ते मी सांगू शकतो अलिशा समोर..
मला काही हरकत नाही. - फर्नांडिस अडखळत बोलू लागला.त्याबरोबर दोघी त्याच्याकडे पाहत सोफ्यावर बसल्या.
फर्नांडिस बोलू लागला -
सेलेना तुला माहितीच असेल की मी तुला खूप पसंत करतो. I’m in love with you! आणि काही दिवसांपासून मी विचार करतोय की ही योग्य वेळ आहे, आणि आपण दोघे या विषयावर थोडी चर्चा करू शकतो.फर्नांडिसचे शब्द ऐकल्या बरोबर सेलेना थोडी अवघडल्यासारखी काहीतरी म्हणायचा प्रयत्न करत इकडे तिकडे पाहू लागली. ती आता पुन्हा काहीतरी बहाणा मारणार हे लक्षात येताच अलिशा ने पुढाकार घेतला.

YOU ARE READING
मैत्रिण माझी लाडाची
Romanceअलिशाने हॅरीची तिच्याकडे पाहण्याची बदललेली नजर कधीच ओळखली होती. पण तिने स्वत:हुन कधीच पुढाकार घेतला नव्हता. त्यात तो अलिशाच्या अगदी जवळच्या मैत्रिणीचा.. सेलेनाचा मुलगा होता. अगदी आपल्या मुलाच्या वयाइतकाच... त्यामुळे तिने असे धाडस कधीच केले नव्हते. आ...