मैत्रिण माझी लाडाची - 2

2K 9 2
                                    

नवीन दिवस उजाडला. ऑफिसची वेळ संपत येताच सेलेना फटाफट सगळी कामे आवरु लागली. तिच्या समोरच्याच डेस्कवर बसणारी अलिशा अजुनही फोनवर कोणत्या तरी क्लायंटशी बोलत असल्याचे तिने पाहिले. डेस्कवरचे सामान आवरत असतानाच ऑफिसमधील त्या दोघींच्या सोबत काम करणारा सहकारी फर्नांडिस तिथे आला.

फर्नांडीसला पुर्ण ऑफिसमध्ये एकुलती एक देखणी.. गोरीपान.. नीटनेटकी अशी दिसणारी सेलेना मनापासून आवडत होती त्यामुळे तो वेळचेवेळी तिच्यासाठी अक्षरश: लाळ गाळत तिला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असे. फर्नांडीसला कदाचीत असे वाटत असावे की पतीचे निधन झाल्यापासून सेलेना इतक्या वर्षांपासून एकटीच राहते आणि तिला एका जोडीदाराची गरज तर असेलच. त्यामुळे ती आपल्याला सहज पटेल.

तो सेलेनाकडे निरखुन पाहत डेस्कमधील पॅसेज मधुन वाट काढत चालत येऊ लागला. तो इकडेच येतोय हे पाहिल्यावर सेलेनाला कळाले की हा उपटसुंभ आता पुन्हा तिचं डोकं खाणार. ती त्याच्याकडे लक्ष नसल्याचे दर्शवत काम करु लागली. फर्नांडिस तिच्यासमोर येऊन दोन्ही खिशामध्ये आपले हाथ सरकवत तिच्याकडे पाहत उभा राहिला.

Hey, सेलेना आज तुला थोडा वेळ आहे का?
मी आज सर्वांना मस्तपैकी जापनीज डिनरची पार्टी देत आहे. - फर्नांडिस

Hey.. हो का? आज काही विशेष आहे? - सेलेना

हो.. Actually.. आजचा दिवस...
माझ्यासाठी खुपच स्पेशल आहे - फर्नांडिस थोडा लाजतच म्हणाला.

त्याचं हे लाजत बोलणं पाहुन फर्नांडिसच्या मागे असलेल्या डेस्कवरील अलिशा आपल्या तोंडातुन फुस्स्स असा आवाज काढत हसली. तिला हसु आवरलेच नाही. तिच्या हसण्याच्या आवाजाने फर्नांडिस मागे वळुन पाहु लागला. तशी अलिशा त्याला समजु नये म्हणुन फोनवर बोलत हसायचे नाटक करु लागली आणि तिने फर्नांडिसला हातानेच Hello करत मी फोनवर बोलतेय.. अशी खुण केली.

ओह... अलिशा.. तु पण आहेस का इथे..
सॉरी माझं लक्षच नव्हतं तिकडे... - फर्नांडिस काहीसा खजील होतच म्हणाला. त्याने गृहित धरले होते की सेलेना कदाचीत यावेळी एकटीच असेल.

मैत्रिण माझी लाडाचीHikayelerin yaşadığı yer. Şimdi keşfedin