- मैत्रिण माझी लाडाची या कथेच्या दुस-या भागात आपण वाचलं -
अलिशाच्या घरी झालेल्या छोट्याश्या पार्टीनंतर मध्यरात्री अलिशा आणि तिची मैत्रिण सेलेना हिचा मुलगा हॅरी दोघेही भावनेच्या भरात कामातुर होऊन एकमेकांशी रत होतात. दोघांचा रोमान्स चालू असताना त्यांच्या नकळत अलिशाचा मुलगा रॉन हा किचनमध्ये येतो आणि तो अलिशाला त्याचा मित्र हॅरीसोबत अर्धनग्नावस्थेत पाहुन झालेला प्रकार समजुन जातो.
आता पुढे -
रॉन दबक्या पावलांनी आपल्या रूम मध्ये येत पुन्हा बेडवर पडला. डोळे बंद करत स्वत:च्या विचारांवर ताबा मिळवण्याचा निश्क्रिय प्रयत्न करु लागला. काही मिनिटापूर्वीच आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या प्रकारामुळे आता त्याची झोप उडाली होती. सतत एक ना अनेक असंख्य विचार करुन त्याच्या डोकयात कळा येऊ लागल्या. कळा असह्य झाल्याने तो बेडवरुन तसाच उठला आणि घराबाहेर येत समुद्राच्या दिशेने चालत जाऊ लागला.
समुद्रकिनारी पोहोचताच मोठमोठ्यानी रडत रॉनने आपले गुडघे अक्षरश: वाळून रुतवले. समुद्राच्या येणा-या लाटात त्याच्या अश्रुचे थेंब आणखी खारट होत मिसळले. बराच वेळ समुद्रात दुरवर पाहत किनारी बसुन राहिल्यावर त्याला मध्येच कधीतरी झोप लागली. तो वाळूवर तसाच निद्रावस्थेत गेला. सकाळ होताच चेह-यावर पडलेल्या गुलाबी उजेडाने त्याला हलकीशी जाग आली. गालावरच्या अश्रूंचा डाग वाळून गेला होता. तो तसाच थोडावेळ पडून राहिला. समुद्रकिना-यावरील वाळूवर पडल्या पडल्याच तो मान वळवुन त्याच्या घराकडे पाहू लागला. काल पाहिलेल्या प्रकाराने त्याची घरी परत जायची इच्छाच होत नव्हती.
काही मिनिटे तसाच पडून विचार केल्यानंतर रॉन उठला आणि तसाच सेलेनाच्या घरी चालत जाऊ लागला. तिच्या घरी पोहोचताच त्याने दरवाजा उघडला. सेलेना नुकतीच उठुन किचनमध्ये तिच्यासाठी कॉफी तयार करत उभी होती. रॉनला पाहताच तिने स्मितहास्य करत त्याचे वेलकम केले.
JE LEEST
मैत्रिण माझी लाडाची
Romantiekअलिशाने हॅरीची तिच्याकडे पाहण्याची बदललेली नजर कधीच ओळखली होती. पण तिने स्वत:हुन कधीच पुढाकार घेतला नव्हता. त्यात तो अलिशाच्या अगदी जवळच्या मैत्रिणीचा.. सेलेनाचा मुलगा होता. अगदी आपल्या मुलाच्या वयाइतकाच... त्यामुळे तिने असे धाडस कधीच केले नव्हते. आ...