माजिदा बेगम - भाग दुसरा
पुर्वार्ध - माजिदा बेगमच्या पहिल्या भागात आपण वाचले की संतोषला माजिदाने बाल्कनीतुन फेकलेले लेटर मिळते ते वाचुन त्याची भितीने गाळण उडते आणि तो सैरभैर होत विचारात बुडुन जातो. माधवीला या विषयाचा काहीच मागमुस लागु न देता अखेर तो माजिदा बेगमला भेटायला तिचा फ्लॅट शोधत बिल्डिंग मध्ये जातो.
- आता पुढे -
स्थळ - मुंबई
वेळ - दुपारचे 3:00चौथ्या मजल्यावर पोहोचताच संतोषची नजर सर्वत्र फिरली आणि त्याला फ्लॅट क्रमांक - 11 दिसला. हातानेच आपल्या कपाळावर आलेले सिल्की केस साईडला करत तो उसने अवसान आणत पुढे गेला. खरं तर त्याला आतुन कमालीची भिती वाटत होती. पण त्याचा नाईलाज होता. माजिदा बेगमने तीन चार कानफटात मारल्या तरी मुकाट्याने सहन करायचे या विचारातच तो फ्लॅट च्या दरवाज्यासमोर उभा राहिला. उजवीकडे असलेले डोअर बेलचे बटण त्याने थरथरत्या हाताने प्रेस केले. टीर्रर्रर्रर्र असा कर्कश आवाज होताच त्याने झट्टदिशी आपला अंगठा बटणावरुन काढुन घेतले आणि तो दरवाजा उघडायची प्रतिक्षा करु लागला.
दोन एक मिनिटांनी हळुवारपणे दरवाजा उघडला गेला. समोर एक म्हातारी होती. संतोषला वाटले हीच ती म्हातारी "माजिदा बेगम" जी आता आपल्याला काठीने चांगलीच बदडुन काढेल. आज सकाळीपासून ही तिसरी वेळ. सर्वात आधी कट्टयावर बसले असताना त्या म्हाताऱ्याने ओरडले, त्यानंतर बिल्डिंग खाली आणखी एक म्हातारी जी संतोष बिल्डिंगच्या आत येताक्षणी एखाद्या डिटेक्टिव्ह प्रमाणे विचारपूस करत होती आणि आता ही आणखी एक म्हातारी बाई. संतोष ला आज "वर्ल्ड सिनिअर पीपल्स डे" आहे की काय असे उगाचच वाटुन गेले.
मी संतोष.. ते.. मला..
ते.. काल.. तुमची चिठ्ठी मिळाली.. - संतोष कसाबसा चाचपडत अडखळत कपाळावरचा घाम रुमालाने पुसत त्या म्हातारी सोबत बोलू लागला.आं...? - म्हातारीने तोंडातल्या कवळ्या सांभाळत गळ्यातुन आवाज काढला. संतोष काय बोलतोय तिला काहीच समजेना. तिला वाटले हा ट्युशनसाठी तिच्या मुलीकडे म्हणजेच माजिदा कडे आलाय.
VOUS LISEZ
माजिदा बेगम
Roman d'amourमाजिदाच्या मनात कामवासनेचा खेळ असाच आणखी काही दिवस चालला. ती रोज पहाटे नमाज पडताना समोरच्या बिल्डिंग मध्ये असलेल्या बाल्कनीत नजर ठेवुन असायची. पण ते दोघे पुन्हा कधीच तिच्या दृष्टीला पडले नाहीत. अखेर तिने न राहवुन स्वतःच पुढाकार घ्यायचे ठरवले. तिला म...