कविता मॅडम... भाग १

14.3K 32 8
                                    

त्यावेळी मी नुकतेच सिव्हील इंजिनीअरींग पुर्ण केले होते आणि एका छोट्या कंपनीमध्ये ज्युनीअर इंजिनीअर म्हणून काम करायला लागलो होतो. आमची कंपनी छोटी म्हणजे अगदीच छोटी होती, बॉस धरून इन-मीन ५ माणसे.... बॉस पर्सनली सगळे प्रोजेक्ट हॅन्डल करत होते आणि त्याना एक सिनीअर इंजिनीअर असीस्ट करत होता. त्यांनी मला ज्युनीअर इंजिनीअर म्हणून घेतले होते आणि बहुतेक मी ड्राफ्ट्समनचे काम करत ऑफीसमध्येच असायचो. एक प्युन होता आणि एक टायपीस्ट मॅडम..... कविता मॅडम...

मी ही कंपनी जॉईन केल्यानंतर थोडे दिवस मला तेथे रुळायला गेले आणि मग माझी सगळ्यांशी चांगली मैत्री झाली (होतेच कितीजण म्हणा मैत्री व्हायला... सिनीयर इंजिनीअर, प्युन सुनील आणि कविता मॅडम). इंजिनीअर जोशी साधारण ३८ वर्षाचे होते त्यामुळे त्यांच्याबरोबर आदराचेच संबंध होते. प्युन सुनील ३० वर्षाचा होता आणि कविता मॅडम साधारण ३२-३३ च्या होत्या. ऑफीसमध्ये सगळ्यात लहान मीच होतो (वय २० वर्षे). मी सोडून सगळे विवाहीत होते.

बॉस आणि सिनीअर इंजिनीअर, जोशी सकाळी तास दोन तास ऑफीसमध्ये असायचे आणि मग साईट विजीट, मिटींग वगैरे साठी निघून जायचे आणि अगदी क्वचीत कधीतरी दुपारनंतर ऑफीसमध्ये यायचे नाहीतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी यायचे. नंतर ऑफीसमध्ये मी, कविता मॅडम आणि प्युन, सुनील असे तिघेजणच रहायचो. आणि सुनीलसुद्धा त्याच्या डिस्पॅचींगच्या आणि इतर कामासाठी बऱ्याचदा बाहेर जायचा. तेव्हा बराचवेळ ऑफीसमध्ये मी आणि कविता मॅडम एकटेच असायचो.

ऑफीसही तसे छोटेच होते. दरवाजातून आत आल्यावर एक छोटी वेटींग एरीया, डाव्या बाजूला बॉसची केबीन व उजव्या बाजूला मीटींग रूम. थोडे पुढे आले की पुन्हा डाव्या बाजूला ड्राफ्टींग सेक्शन आणि उजव्या बाजूने आत गेले की कविता मॅडमचे क्युबीकल टेबल. तेथेच बाजूला छोटे डायनींग टेबल, पॅन्ट्री प्लॅटफार्म आणि टॉयलेट होते. वेटींग एरीयात एक थ्री सीटर विजीटर सोफा होता आणि समोर रिसेप्शन टेबल होते. पण कोणी रिसेप्शनीस्ट नसल्यामुळे टेबल रिकामे असायचे आणि कविता मॅडमच ’रिसेप्शनीस्ट’ चे काम करायच्या. तसे तर त्या टायपीस्ट कम अकाऊंटंट कम अँडमिनीस्ट्रेटर असे सगळेच काम करायच्या.

कविता मॅडम...Where stories live. Discover now