तीच्या नावावरून वारंवार माझी नजर जात होती.. तेवढ्यात तीचा लाईट हिरवा झाला. म्हणजे ती ऑनलाईन आली..
मी खुप पेटलेलो आहे. शब्द मनात म्हणाला. आणि तीला मॅसेज टाकला.
बोल नं !!
ती अबोल होती.. तीने रिप्लाय नाही दिला...
येतेस नं स्वरा?
तरी नो रिप्लाय..येतेस नं गं ...???
समोरून काहीच रिस्पॉन्स नव्हता. मी.वैतागून मोबाईल फेकला.
माझं लक्ष माझ्याच कॅनवास कडे गेलं. त्यावर रेखाटलेल्या तैलचित्रातून डोकावणार्या तहानलेल्या मृगाकडे.
मी गेलो आणी त्याच्या समोर एक विस्तीर्ण समुद्र काढला.
माणसाला समुद्रातून पाणी पीता येत नाही, पण हा मृग आहे, माणूस नाही.
मी मात्र माणूस आहे!! सिलेक्टिव्ह आणी स्यूडक्टीव्ह.
मला समोर काय करावं कळत नव्हतं. मी पेन आणी पेपर घेतला आणी विचार करत राहिलो. फक्त विचार...