Part १

6K 6 2
                                    

माझं नाव साहिल, मी पुण्याला आय टी कंपनी मध्ये जॉब करतो, घरी मी माझा मोठा भाऊ संदीप, आई आणि बाबा असं आमचं कुटुंब आहे, मी त्यात सर्वात छोटा आहे. संदीप आणि माझं जास्तं पटत नसे. तो जास्त शिकलेला नव्हता जेम तेम आठवी, म्हणून त्याला बाबांनी किराणा चं दुकान टाकून दिलेलं. त्याच्या वयात आणि माझ्या वयात अगदी ३, ४ वर्षांचंच अंतर होतं, म्हणजे मी २३ चा तर तो २६ चा असं.
मी पुण्याला मस्त जीवन जगत होतो, माझी गर्लफ्रेंड ही होती, ती पण माझ्याच ऑफिस मधली, आम्ही खूप साऱ्या ठिकाणी सोबत फिरायला जायचो वीकेंड ला.
आम्ही फिरायला गेल्यावर सोबतच राहायचो.
एके दिवशी मी आणि माझी गर्लफ्रेंड रीता आम्ही लोणावळ्याला गेलो होतो, रात्रीचं डिनर करून झालं आणि आम्ही रूम मध्ये पोहचलो मी दरवाजा लावतोय आणि इतक्यात, मला बाबांचं कॉल आला,

बाबा - हॅलो साहिल, संदीप चं लग्न ठरलंय, पुढच्या महिन्यात आटपायचं ठरलंय, ३ ला हळद आणि ४ ला लग्न आहे.

मी - बाबा, ३ ला माझी मीटिंग आहे बँगलोर ला पण मी रात्री पर्यंत येईन, आणि तुम्हाला उद्या मी तुमच्या खात्यावर वर पैसे पाठवतो ते ठेवा खरचं होईल

बाबा - चालेल, साहिल.

मी - बाबा, मुलगी कुठची आहे?

बाबा - अरे मामांनी स्थळ आणलंय, ती दुसऱ्या तालुक्याची आहे, मीनल नाव आहे, चांगली आहे मुलगी, कुणाच्या अद्द्यात नाही का मद्द्यात नाही, गावात ली आहे.

मी - चांगलं झालं चला दादाचं लग्न होऊन सुधारेल तो.

बाबा - (हसत म्हणाले) हा.

मी - चला बाबा ठेवतो मी बाहेर आहे...

बाबा - चालेल ठीक आहे, काळजी घे नीट रहा..

मी - हो बाबा तुम्ही पण.. बाय.

बाबा - बाय..

रीता - कोण होते, बाबा?

मी - हो गं, संदीप चं लग्न ठरलंय, बरं झालं नाहीतर नुसतं दारू प्यायचा.

मी चालत असताना..
रीता ने मला तिच्याकडे ओढलं मी माझं तोल सावरत तिच्यावर पडलो, ती मला मिठी मारत म्हणाली,

अचानकWhere stories live. Discover now