पार्ट २

3.4K 7 2
                                    

दिसायला अगदी मला बोरिंग वाटत होती, थोडी जाडी होती, आणि माझ्या पेक्षा उंची ने कमी होती, नाईलाजाने मी वरमाळा घातली, तिने ही मला घातली, माझ्या चेहऱ्यावर अजिबात हास्य नव्हतं, फक्त किंचित हसायचो येवढंच.

सर्व आहेर देणं झालं, जेवताना ही मी माझं माझं जेवलो, ती ही पाहत होती माझं स्वभाव त्या दिवशी, सर्व कार्यक्रम पार पडलं पण मी तिच्याशी एक शब्द ही बोललो नाही अख्या कार्यक्रमात.

रात्री वरात घरी पोहोचली, येणारे पाहुणे सर्व गेले.
खालचं बेडरूम आम्हाला दिलेलं. मी त्या दिवशी गप येऊन झोपलो, कारण माझ्या मनात फक्त रितू होती, आणि बाकी कोणाचं ही विचार करू शकणार नव्हतो.

ती ही मला झोपलेलं बघून माझ्या बाजूला येऊन झोपली, आता नवरा नवरी असल्यामुळे ती थोडी माझ्या जवळ आली, थोडी चिटकली, हात माझ्या हातावर ठेवलं, आणि मला जाग आली, मी तिथून उठून रागारागात खाली लादी वर झोपलो.
झोपताना मला तिच्या रडण्याच्या हुंदक्यांचा आवाज येत होता, पण मी काही लक्ष दिले नाही, आणि तसाच झोपी गेलो.

सकाळ झाली,
तिच्या अगोदर मी उठलो,आणि जॉगिंग ला गेलो.
काल सर्व अचानक जे काही घडलं, त्यातून जरा आराम मिळावा म्हणून मी आमच्या शेतावर जाऊन असंच विचार करत बसलो, की रितू चं पुढे काय, हे कसं झालं, तिला काय उत्तर देऊ ह्यातच मी हरपून गेलो, आणि मला त्यात संकेत चा खूप राग आलेला, पळायचंच होतं तर तयार कश्याला झालास लग्नाला.

ती दिसायला मस्त होती, पण बोलणं वागणं हे सारं गावातल्या सारखं होतं.

एक दीड तासांनी, मी घरी यायला निघालो, घराजवळ येताच भांडायचं आवाज ऐकू यावू लागला मला, आत जाऊन पाहतोय तर रितू होती,
मी दिसताच रितूने मला रडत घट्ट मिठी मारली सर्वांसमोर, रडत तिने गालावर कपाळावर चुंबन करू लागली, आणि म्हणू लागली...

रितू - हे काय आहे साहिल!!! ही कोण आहे तू लग्न केलंयस, मग मी कोण आहे.

मी तिला घट्ट मिठीत घेत म्हणालो, सॉरी रितू मला माफ कर, हे सर्व कसं घडलं हे मला ही कळलं नाही.

अचानकDonde viven las historias. Descúbrelo ahora