मला डिनर ला काय हवंय हे सांगण्यासाठी काउंटर कडे वळलो, मिनू ला सांगितले की तू पुढे हो म्हणून..
ती पुढे गेली, मी ऑर्डर देऊन रूम कडे जायला निघालो.
माझ्या रूम च्या जवळ पोहचतोय इतक्यात एका दरवाज्यातून माझी कॉलर पकडली आणि मला रूम मध्ये खेचलं, आणि रूम मध्ये पुर्ण अंधार मी हात झटकण्याचा प्रयत्न केला तितक्यात लाईट ऑन झाली,
आणि पाहतोय तर समोर रितू...
मी आश्चर्य चकित झालो.. रितू काश्मीरला कशी काय...
इथून पुढे..रितू जशी माझ्यावर भुकेल्या वाघिणी सारखी तुटून पडली, मी तिला सोडवण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती काही ऐकत नव्हती, मी शेवटी तिला बाजूला ढकलली आणि म्हणालो..
रितू तुला काही कळतंय का? काय चालू आहे तुझं आणि तू इथे का? आणि कशी?रितू - तू ज्या च्यावरून फ्लाईट बुक केलीस ते माझ्या वरती लॉगिन आहे कळालं ना. तू काही फोन वगेरे काही उचलत नाहीस, म्हणून मला हे पाऊल उचलायला लागलं.
मी - अगं मी मीनल सोबत हनिमून ला आलो आहे.
रितू - मग मी ही त्यासाठीच आले आहे...
मी - कोणासोबत??
रितू - तुझ्यासोबत.
मी - तू वेडी वगेरे झालियेस का तू काय म्हणाली होतीस की मी तुमच्या मध्ये पडणार नाही म्हणून.
रितू - हो बोलले, पण मला जे दुःख झालंय त्याची भर
कोण काढणार आहे?मी - रितू सॉरी चुकलं माझं म्हणतोय ना आता अजून काय करू...
रितू - काही नको हे दररोज चे खेळ बस झाले..
आणि ती म्हणाली एक तर मी किंवा ती किंवा आम्ही दोघी
मी - रितू का आमच्या मध्ये येतेस अगं तू... सुखाने चालू आहे ना आमचं.
रितू - आणि माझं काय.
मी - तुला मी मुलगा शोधून देईल, माझ्या सारखा चालेल.
रितू - नको मला तूच हवा आहेस..
आता मी ठरवलं मला काही तरी करायला लागेल.
मी तिकडून तसाच निघालो, मीनल दरवाजा जवळ वाट बघत होती.