चार पाच पायऱ्या चढून ते आत गेले. समोर काउंटरवर एक म्हातारा माणूस चष्मा घालून बसला होता. सगळीकडे झिरो बल्बचा अंधुक प्रकाश पसरला होता. स्पिकरवर बेबी डॉल लागलं होतं. ती मनातून पुरती घाबरून गेली होती. तिच्या हृदयाची धडधड आणखीच वाढली होती. ती अक्षरशः थरथर कापत होती. एकतर तर तिने भलतंच पाऊल टाकण्याचं धाडस केलेलं होतं आणि त्यात ती असल्या भीतीदायक ठिकाणी आली होती. बाजूच्या टेबलांवर दोन चार कळकट मळकट मध्यमवयीन पुरुष दारू ढोसत होते. ते दोघेही आता काउंटरजवळ पोचताच त्या लोकांच्या किळसवाण्या नजरा तिच्यावर रोखल्या गेल्या. तिला भयंकर अवघडल्यासारखं वाटू लागलं. त्यांच्याकडे प्रयत्नपूर्वक दुर्लक्ष करत ती त्याला खेटून उभी राहिली. तो काउंटरवरचा म्हातारा चष्म्याच्या काचेतून डोळे किलकिले करत त्या दोघांकडे पाहू लागला.
"रूम आहे का?" त्याने म्हाताऱ्याला विचारलं.
"फुल नाईट का शॉर्ट टाइम?" म्हाताऱ्याने प्रतिप्रश्न केला.
"एsss! थांबशील का रात्रभर?" त्याने अर्पणाला विचारलं.
"कुठे?" ती पूरती गडबडून गेली होती. त्याने कपाळाला हात लावला. ती त्याच्या अंगाला खेटत त्याच्या हाताच्या कोपराला धरून अंग चोरून उभी होती.
"शॉर्ट!" तो बोलला.
"शॉर्ट पाचशे आणि नाईट दीड हजार!" म्हातारा त्यांच्याकडे न पाहता बोलला.
"स्वच्छ आहेत का रूम?" तो
"स्टार!" म्हाताऱ्याला जणू एकेका शब्दाची किंमतच मोजावी लागते होती.
"एक द्या! आणि पाकीट आहे का?" तो
"पाकीट पाचशे!" म्हातारा
"पाकीट राहुद्या! रूम द्या एक!" तो पाचशेची एक नोट त्या म्हाताऱ्याच्या हातात देत बोलला
"आयडी?" म्हाताऱ्याने एक रजिस्टर उघडून त्याच्यासमोर ठेवलं. त्याने आणखी शंभराची नोट म्हाताऱ्याला दिली. त्याने रजिस्टरमध्ये दोघांचीही खोटी नावं खरडली.
"सरकाsssss र! २०६ दे यांना." म्हाताऱ्याने आवाज दिला.
एक तुडतुडा वीसेक वर्षांचा तरुण हातात चाव्या घेऊन आला.
"चलो साबजी!" सरकार
ते दोघेही गुपचूप त्याच्यामागे चालू लागले. काउंटरच्या बाजूच्या किरकीऱ्या काचेच्या दरवाजातून आत जात ते जीना चढत होते. आख्ख्या हॉटेलात कुठेही प्रखर प्रकाश नव्हता. जागोजाग झिरो बल्बचा मंद उजेड होता. तिला आपण उगाच होकार दिला असं वाटत होतं. तिची छाती जोरजोरात धडधडत होती पण ती निमूटपणे त्याच्या मागोमाग जात होती. रूमजवळ पोचल्यावर त्या सरकारने रूमचं कुलूप काढलं आणि तो बाजूला सरकून उभा राहिला. अक्षयने तिला मानेनेच आत जाण्याचा इशारा केला. घाबरत घाबरत ती आत गेली.
"पाकीट हैं क्या रे?" तो सरकारला बोलला
"हैं ना साब पचासवाला, सौवाला?" सरकारने विचारलं
"पचासवाला दे एक फटाकसे!" तो. सरकारने एक पाकीट त्याच्या हातावर ठेवलं आणि त्याने दिलेली पन्नासची नोट घेऊन तो निघून गेला. त्याने दार लावून घेतलं आणि तो आत आला. ती अंग चोरून बेडवर बसली होती. भीतीने तिचं अंग थंडगार पडलं होतं. ती थरथर कापत होती.
"आता सोड की तो स्कार्फ!" तो तिच्या शेजारी बसला आणि आपले बूट सॉक्स उतरवू लागला. तिने चेहऱ्याला गुंडाळलेला स्कार्फ सोडला आणि बेडवर टाकला. तो आपले सॉक्स उतरवून सरकत बेडच्या भिंतीकडील टोकाजवळ जाऊन टेकून बसला. ती मात्र तशीच बेडच्या कडेवर अवघडून बसली होती.
"अक्षुदाजी! मला इथे भीती वाटतेय खूप!" ती त्याच्याकडे न पाहताच बोलली.
"आता घाबरू नको. इथे कुणी येणार नाही आता." तो शर्टची बटणं काढत बोलला. तिला पुनःपुन्हा आपण काहीतरी चूक करतोय असं वाटत होतं. त्याने आपला शर्ट उतरवून बाजूच्या टेबलवर ठेवला. पँटच्या खिशातील सगळं सामान काढून तेही टेबलवर ठेवलं.
"ये इथे बस!" तो.
ती हळूच उठून त्याच्याशेजारी थोडं अंतर ठेवून भिंतीला टेकून पाय सरळ करून बसली. तिने उशी मांडीवर घेतली आणि उगाच नखांवरील नेलपेंट खरडत ती वेळ घालवू लागली.
"काय झालं अर्पणा?" तो
"मला खरंच खूप भीती वाटतेय! आपण जाऊया आता!" ती
"माझ्यावर विश्वास नाहीये तर तुझा!" तो
"तसं नाही दाजी! मी आलीच नसते मग तुझ्याबरोबर." ती
"मग कसं?" तो
"आपलं लग्न व्हायचंय अजून!" ती
"आपल्या लग्नाला काही प्रॉब्लेम येईल असं वाटतं का तुला?" तो
"नाही पण..." आता काय बोलावं हे तिला कळेना. तो तिच्या जवळ सरकला आणि तिचा डावा हात आपल्या दोन्ही हातात घेत त्याने घट्ट धरला आणि म्हणाला,
"तुला नको वाटत असेल तर जाऊया आपण. पण आता याला पैसे दिलेच आहेत तर आपला वेळ संपेपर्यंत बसू इथे गप्पा मारत."
त्याच्या या वाक्याने तिला जरा बरं वाटलं. आणि त्याच्या हातांचा स्पर्शही तेवढाच आश्वासक होता. आयुष्यात असा स्पर्श ती पहिल्यांदा अनुभवत होती. तिची धडधड थोडीशी कमी झाली.
"सॉरी दाजी! पण खरंच मला असं नव्हतं करायचं. मी हो म्हणाले तेव्हाही भीती वाटली होती मला पण तुला नाराज करायचं नव्हतं!" ती
"असुदे! काही प्रॉब्लेम नाही.!" त्याने तिचा हात सोडला आणि डोळे मिटून भीतीला डोकं टेकून पडून राहिला.
"आर्पे!" तो
"हं!"
"एक किस तरी देशील की नाही?" तो. तिची आताशा शांत होऊ लागलेली छाती क्षणार्धात पुन्हा जोरजोराने धडधडू लागली. पण आता भीतीने नव्हे! तिलाही ते हवं होतंच. हे वयच तसं असतं. अशा गोष्टींबद्दल कमालीची उत्सुकता, आकर्षण या वयात असतेच. ती काहीच बोलली नाही. त्याने समजायचं ते समजून घेतलं.
तो उठून तिच्या जवळ आला. तिच्या चेहऱ्याजवळ आपला चेहरा नेट त्याने तिच्या नजरेत आपली नजर गाडली. डोळ्यांना डोळे मिळताच तिची नजर लाजेनं खाली झुकली. तिच्या छातीची वरखाली होणारी हालचाल त्याला दिसत होती. तिच्या कपाळावर घामाचे बिंदू जमा झाले होती. तिच्या तोंडाला कोरड पडली होती. ओठांवर पुन्हापुन्हा जीभ फिरवत ती सूकत असलेले ओठ ओले करत होती. तिची ओठ थरथरत होते. दुपट्ट्याची दोन्ही टोकं आपल्या हातात धरून तिने घट्ट मुठी आवळल्या होत्या. त्याचे श्वास तिच्या चेहऱ्यावर धडकल्याचं तिला जाणवत होतं. त्याने आपला चेहरा आणखी जवळ नेला. तिने डोळे मिटले. तिच्या ओठांना त्याच्या ओठांचा अगदी पुसटसा स्पर्श झाला. तिने एक मोठा श्वास घेतला. तिला आता छातीची होणारी धडधड आवडू लागली होती. आपली छाती कायमच अशी जोरात धडधडत राहावी असं तिला वाटत होतं. त्याने आपल्याला जोरात किस करावं असं तिला वाटत होतं. हाताने तिच्या हनुवटीला धरून त्याने तिचा चेहरा थोडा वर केला.
STAI LEGGENDO
नवयौवना
Storie d'amoreवयात आल्यावर पहिल्या प्रणयाची तारुण्याने भरलेल्या नवयौवना ची प्रणय लिला...