रहस्य(Rahasya)...भाग ४ (Chapter 4)
"अन्या...ए अन्या... अनिरुद्ध... ऐकायला येतंय का तुला...? अन्या..." माझ्या नावाने कोणीतरी मला हाक मारत होतं. वेगवेगळ्या आवाजात...! मात्र मी शुद्धीत नव्हतो संपूर्ण अंग अगदीच निपचीत पडले होते. सुरुवातीस श्वास अगदी नीट चालू होता. मात्र अचानक माझा श्वास बंद झाला. मला कोंडल्यासारखे वाटू लागले. मी खूप जोरात श्वास घेण्याचा प्रयत्न केला. इतक्यात पुन्हा कोणीतरी "अन्या..." अशी मला हाक मारली. मी ताडकन उठलो... डोळ्यांसमोर अस्पष्ट चित्र होते हळूहळू ते स्पष्ट झाले... माझ्यासमोर माझे मित्र होते. त्यांना समोर पाहून मनामधली काळजी थोडी कमी झाली. वाड्यामध्ये वरच्या मजल्याच्या एका खोलीमध्ये आम्ही होतो. "अन्या... काय रे बरं वाटतंय का आता...? अरे गेला अर्धा तास तू बेशुद्ध पडला होतास" राहुल मला म्हणाला. मला काहीच कळेना की मी त्या खोलीत कसा पोहोचलो मी म्हणालो,"हो... बरं वाटतय आता... पण मी इथे कसा? मी तर खाली त्या हॉलमध्ये बेशुद्ध पडलो होतो...मग इथे कसा पोहोचलो...?" "ते आम्हाला पण माहित नाही... पण अरे हे तुझे गोपी काका मला बरोबर वाटत नाहीत. तू बाहेर गेल्यानंतर ते काहीतरी विचित्रच बरळायला लागले. जणू एखादं नाव सारखं सारखं घेत होते असं वाटत होतं." प्राची फारच घाबरलेली... खूप गडबडून ती बोलत होती, "आणि अरे एका क्षणाला आम्हाला सर्वांना चक्कर येऊ लागली आणि आम्ही बेशुद्ध पडलो. उठून पाहतो तर इथे आपण सर्व होतो. मला या गोपी काकांवर शंका आहे. अरे आम्हाला चक्कर येत होती तेव्हा आम्हाला सावरायच्या ऐवजी ते हसू लागले रे...." ते ऐकून मी ताबडतोब उठलो आणि दरवाजापाशी गेलो. दरवाजा उघडायचा प्रयत्न केला मात्र दरवाजाला बाहेरून कडी होती. आम्ही त्या खोलीमध्ये अडकलो होतो नव्हे आम्हाला त्या खोलीमध्ये अडकवलं होतं.
"ते गोपीकाका नाही आहेत." मी म्हणालो. सर्वच माझ्याकडे आश्चर्याने बघू लागले. मी पुन्हा तेच वाक्य बोललो,"ते गोपीकाका नाही आहेत." " काय बोलतोय तू...? कळतंय का तुला तू काय बोलतोयस ते...?" साक्षी अडखळत बोलली. "हो ते गोपीकाका नाही आहेत... गोपीकाका अजूनही वाड्याच्या बाहेर त्यांच्या झोपडीमध्ये आहेत. आपण ज्यांना गोपीकाका समजत होतो तो एक भूत आहे... राक्षस... आत्मा... I Don't Know नक्की कोण आहे तो.... पण तो माणूस गोपीकाका नाही आहे... Actually तो माणूसच नाही आहे... कारण मी जेव्हा बेशुद्ध पडत होतो तेव्हा त्या माणसाच्या डोळ्यांमधून एक...एक वेगळाच प्रकाश आला आणि तो हसत होता. फारच क्रूर होतं ते हसणं अगदी एका राक्षसासारखं..." हे ऐकून सर्वचजण खूप घाबरले. कारण हे सर्व त्यांच्या देखील विचारांपलीकडचं होतं. "म्हणजे... म्हणजे आपण एका भूता सोबत होतो...? असा भूत जो आता आपल्यासोबत काहीही करू शकतो...?" "म्हणजे आपण आता या वाड्यातच अडकलो...? कायमचंच...! आता आपण पुन्हा घरी नाही जाऊ शकणार का...?" "अरे आपण इथे यायलाच नको होतं... मी तरी सांगतो तुम्हाला... पण हा साला यश... घाबरू नको म्हणे.... मी आहे ना... आता बघ कसा गप बसलाय" सलोनी, प्राची, प्रथम सर्वच एकामागून एक बोलू लागले. त्यांचा खूपच घबराट उडाला होता. मी सर्वांना शांत केले,"श्श्श्....श्श्श्....थांबा जरा थांबा... मला माहितीये माझ्यामुळेच हे सगळं घडत आहे. पण आता घाबरून चालणार नाही कारण जर आपण आता घाबरलो तर त्या माणसाला...I Mean त्या भूताला... म्हणजे तो जो कोणी असेल त्याला... आपल्यासोबत काहीही करायला सोपे जाईल... Ok...! So घाबरू नका आणि जरा आता विचार करूयात ईथून बाहेर कसं पडायचं.? पहिली एक गोष्ट माझं नीट ऐका... मला आज सकाळी एक स्वप्न पडलं होतं...आणि त्या स्वप्नात मी जसं पाहीलं अगदी तसंच माझ्यासोबत घडलं आहे... म्हणजे माझ्या स्वप्नात सकाळी मी दोन माणसांना पाहिलं होतं. एक म्हणजे वाड्यातला हा माणूस ज्यांना आपण गोपी काका समजत होतो आणि एक वाड्याच्या बाहेर माणूस होता जे खरोखर गोपी काका आहेत. मी वाड्यातल्या माणसाला गोपी काका समजून बसलो कारण मी काल गोपी काकांच्या झोपडीमध्ये काही फोटो पाहिले होते त्या फोटोमध्ये वाड्यातला हा माणूस होता. मात्र ते कसं...? आणि मुख्य मुद्दा मी जसे स्वप्न पाहिले अगदी तसेच घडले तरी कसे...? अम्म्म्..... माझं डोकं फुटायची वेळ आली आहे... यार...तर आता तुम्हाला यातून कोणती Hint किंवा Clue मिळतो का ते सांगा. "
तेव्हा प्राचीने मला काही प्रश्न केले,"अन्या... जे खरे गोपी काका आहेत ते कसे दिसतात रे...? त्यांना खूप मोठी दाढी आहे का? आणि...त्यांच्या भुवयांवरली केसं थोडी विरळ झाली आहेत का? आणि ते नेहमी अंगावर एक घोंगडी घेऊन असतात का?" या तिच्या प्रश्नानंतर मला आश्चर्यच वाटले कारण प्राचीने गोपीकाकांना पाहिले देखील नव्हते. तरी ती त्यांचे योग्य ते वर्णन करत होती. "हो बरोबर... पण तुला कसं कळलं?" मी म्हणालो. त्यावर ती म्हणाली,"तुला माहिती आहे ना... काल रात्री आपण गोपी काकांच्या झोपडीपाशी गेलो होतो. तेव्हा परत येताना आपल्याला झोपडीच्या पाठीमागे झाडांमध्ये एक व्यक्ती दिसला होता. मात्र त्यावेळी काळोख होता त्यामुळे त्या व्यक्तीचे तोंड आपल्याला नीट दिसलं नाही. तर आज सकाळी मला देखील एक स्वप्न पडलं होतं. आणि काल जसं घडलं होतं अगदी तसंच मला माझ्या स्वप्नात दिसलं. म्हणजे तुम्ही दोघे त्या झोपडीमध्ये चावी ठेवण्यासाठी आत गेलात आणि मी बाहेरच उभी होते. पण परत येताना तू काही फोटो बघत बसला होतास त्या फोटोमध्ये जो माणूस होता तो म्हणजे वाड्यात जो माणूस आहे तो... बरोबर ना... ज्याला आपण सकाळी गोपी काका समजलो होतो. मात्र माझ्या स्वप्नात मी तो फोटो सुद्धा स्पष्ट बघितला होता. आणि काल परत येताना त्या काळोखातल्या व्यक्तीचं तोंड आपल्याला बघता आलं नव्हतं. मात्र ते देखील मला माझ्या स्वप्नात आज दिसलं आणि त्याच व्यक्तीचं मी वर्णन तुला आत्ता करून दाखवलं... मात्र तू तर आता बोलतोस की तेच गोपी काका... सुरुवातीस मी तो योगायोग समजले... पण तू आता हे सगळं सांगितल्यावर कळतंय की तो योगायोग नाही आहे...!" हे सगळे ऐकल्यावर मी पूर्णपणे थक्क झालो. कारण आज मला जे स्वप्न पडले होते... ते आज माझ्यासोबत घडले. मात्र प्राचीला जे स्वप्न पडले होते ते तिच्या सोबत काल घडलेले... मात्र काल जे तिला पाहता आले नव्हते ते तिला आज स्वप्नात दिसले थोडक्यात गोपीकाकांचा चेहरा...!
तेवढ्यात प्रथम ने हात वर केला आणि म्हणाला,"Guys... आज सकाळी मला सुद्धा एक स्वप्न पडलं होतं." त्यावर प्राचीने सर्वांनाच विचारलं,"एक...एक...एक...Second नक्की आज सकाळी किती जणांना स्वप्न पडलं होतं...?" त्यावर सर्वांनीच हात वर केला. आमच्यासोबत नक्की काय घडतं आहे हे कळण्यास काही मार्गच सुचेना. आता ते वाड्याचं रहस्य उलगडण्यासाठी आम्हाला आमच्या स्वप्नांचं रहस्य समजून घ्यावे लागणार होते. "ठीक आहे... मग सगळ्यांनी आपण एक-एक करून आपली स्वप्न सांगूयात. कारण अन्याला जे स्वप्न पडलं होतं ते आज घडलं... मला जे पडलं होतं ते कालच होतं... त्याप्रमाणेच तुम्हाला जी स्वप्न पडलेली असतील कदाचित तीसुद्धा आपल्याशी निगडीत असू शकतात. तर प्रथम सुरुवात कर" प्राची म्हणाली. त्यावर प्रथमने त्याचं स्वप्न सांगण्यास सुरुवात केली,"मला आज जे स्वप्न पडलं होतं ते आत्ताचं होतं... आत्ताचं म्हणजे आत्ता आपण या खोलीत आहोत याचं. आपण एका खोलीत अडकलेलो होतो आणि दरवाजाला बाहेरून कडी घातली होती हेच स्वप्न मला पडलं होतं ." अच्छा... तर तुझं स्वप्न म्हणजे आपला वर्तमान आहे. आणखी कोणाला वेगळं स्वप्न पडलं होतं का ज्यामध्ये आपला भूतकाळ दिसला असेल किंवा भविष्यकाळ..?" मी सर्वांना विचारले. तर यावेळी यश ने हात वर केला आणि बोलू लागला,"मला कालचं एक स्वप्न पडलं होतं...काल रात्री जेव्हा आपण वाड्यात नुकतेच आलो होतो तेव्हा तुम्हाला आठवतंय का... कि मी एका खोलीतून बाहेर पळत आलेलो. काल खरंतर मी तुम्हाला घाबरवण्यासाठी त्या खोलीत गेलो होतो पण आज सकाळी मला जे स्वप्न पडलं त्या स्वप्नात त्या खोलीमध्ये मी एकटाच नव्हतो." तेव्हा राहुलने त्याला विचारलं ,"मग आणखी कोणी होतं...? कारण आमच्या मधलं तरी कोण नव्हतं तुझ्या सोबत...!" त्यावर यश म्हणाला, "नाही तुमच्यापैकी कोणीच नव्हतं. म्हणजे काल रात्री आपण वाड्यामध्ये शिरलो तेव्हा तुम्हाला मला घाबरवायचे होते. त्यामुळे मी एक जागा शोधत होतो. तर तिकडेच एक खोली मला दिसली. त्या खोलीला बाहेरून कडी होती. मग मी ती कडी खोलून आत मध्ये गेलो आणि आतमधले थोडेसे सामान खाली पाडले आणि पुन्हा खोलीत तुमची येण्याची वाट बघत बसलो. पण तेवढ्यात माझ्या अंगावर एक जाडा कोळी चढला. म्हणून मी घाबरलो आणि पळत बाहेर आलो. एवढं सगळं काल घडलं होतं... आणि ते मला ठाऊक होतं. पण आज स्वप्नामध्ये जेव्हा मी आत खोलीमध्ये गेलो तेव्हा त्या खोलीची सिलिंग तुटलेली होती आणि एक मोठं भगदाड त्या खोलीच्या वरच्या बाजूस पडलेलं. त्या भगदाडातून वरच्या मजल्यावरची एक खोली दिसत होती. आणि मी जेव्हा ते सगळं सामान पाडत होतो तेव्हा एक विचित्र असा माणूस...नाही तो माणूस नव्हता... तो राक्षस वाटत होता. आणि तो राक्षस मानगुटी खाली काढून माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होता. मात्र ते मला काल रात्री माहित नव्हतं आणि.... आणि त्या राक्षसाचा चेहरा अगदी आज आपण गोपी काका समजलेलो त्या माणसासारखाच होता " "अरे मग नालायका... जर तुला हे सकाळीच स्वप्न पडलं होतं. तर मग तू आम्हाला त्या माणसाला त्या रूम जवळ बघितलं तेव्हाच का नाही सांगितलंस? तुला तर दिसलं सुद्धा होतं की तो राक्षस आहे किंवा मग भूत आहे असं..." प्राची यशला शिव्या घालू लागली. सर्वजण यशवर घसरले. मी त्यांना शांत केले. नकळतच आम्हाला आमच्या स्वप्नांद्वारे त्या वाड्याच्या रहस्यांबाबत संकेत मिळत होते.आणि ती वेळ आपापसात भांडण्याची बिलकुल नव्हती. त्यामुळे पुढे साक्षी तिचं स्वप्न सांगू लागली, " अन्या, आज सकाळी वाडा बघता बघता तू वरच्या मजल्याच्या एका खोली शेजारी गेला होतास बघ... पण त्या खोलीचा दरवाजा तुला उघडत नव्हता. कारण आत मधून सुद्धा कडी होती असं तुला वाटलं. पण माझ्या स्वप्नामध्ये मी आणि सलोनी आम्ही दोघी... काल यश ज्या खोलीमध्ये रात्री गेला होता ना... त्या खोलीत जातो... त्या खोलीची वरची सीलिंग तुटली होती आणि तिथे एक मोठं भगदाड पडलं होतं. त्यातून आम्ही वरच्या खोलीत येतो. त्या वरच्या रूम मध्ये गेल्यावर आम्ही पाहतो तर त्या खोलीला आतून सुद्धा कडी होती. कदाचित ती तिच खोली असावी जी तू आज सकाळी उघडण्याचा प्रयत्न करत होतास. त्यावर मी म्हणालो ,"अच्छा आणि त्या खोलीमध्ये आणखी काय काय होतं?" साक्षी पुन्हा बोलू लागली, " ती खोली संपूर्णपणे रिकामी होती मात्र तिथे एक बोर्ड पडला होता जमिनीवर... आज तो माणूस आपल्याला काहीतरी सांगत होता बघ... की त्याच्या बापाने त्याला एक फळा दिला आहे...आणि त्याने तो आत्मा त्या फळ्या द्वारे आपल्या दुनियेमध्ये बोलावला वगैरे... कदाचित तो फळा म्हणजे तोच बोर्ड असावा. त्या बोर्डच्या आजूबाजूला काही मेणबत्या अस्ताव्यस्त पडल्या होत्या" साक्षीचं बोलणं पूर्ण होत नाही तोवर राहुल अचानक बोलू लागला, "तो बोर्ड लाकडाचा होता का गं..? ज्यावर काही मराठी मुळाक्षरे आणि खुणा होत्या. अम्म्म... उजव्या कोपऱ्यामध्ये चुकीची खूण होती आणि डाव्या कोपऱ्यामध्ये बरोबरची...आणि त्या बोर्ड च्या कडेस मध्येच 'Goodbye' असं लिहिलं होत का...?" "हो पण हे तुला कसं माहित? तुला सुद्धा तेच स्वप्न पडलं होतं का?" साक्षीने राहुल ला विचारले. "नाही कदाचित तू त्या खोलीत पोहोचल्यावर पुढे काय होतं ते स्वप्न मला पडलं असावं. कारण माझ्या स्वप्नात आपण सर्वजण त्या खोलीमध्ये बसलो होतो त्या बोर्डला विळखा घालून...! शेजारी काही मेणबत्त्या पेटवल्या होत्या आणि काही प्रश्न विचारत होतो...! पण आपण त्या खोलीमध्ये एकटेच होतो म्हणजे आपल्या सोबत इतर कोणीच नव्हतं मग आपण प्रश्न कोणाला विचारत होतो...? आणि त्या बोर्डवर एक बदामी कृती लाकडाची छोटी फळी होती जी अचानक इकडेतिकडे फिरू लागली होती... कोणीही स्पर्श न करता...! पण मला एक कळत नाही. हा वाडा गेली बारा वर्षे बंद आहे तरीदेखील तो बोर्ड, त्या मेणबत्त्या आणि ती लाकडाची बदामी कृती फळी एकदम नवीन कशी काय वाटत होती?" राहुल म्हणाला. त्यावर साक्षी म्हणाली, "नवीन...! नवीन नव्हता रे... माझ्या स्वप्नात तर मी जो बोर्ड पाहिला होता तो तर अर्धवट मध्येच तुटला होता. नवीन नव्हता तो...!" त्यावर मी म्हणालो," ओइजा(Ouija) बोर्ड...!कदाचित तो ओइजा बोर्ड असेल. कारण पाश्चिमात्य देशांमध्ये हा बोर्ड परलोक विद्या वादासाठी वापरतात. थोडक्यात भूत, प्रेत, आत्मा या सर्वांशी बोलण्यासाठी...! कदाचित या बोर्डाच्या माध्यमातून ती वाईट शक्ती आपल्या या वाड्यात आली असावी. मला माझ्या आजोबांनी लहानपणी अनेक कहाण्या सांगितल्या होत्या. मात्र जेव्हा मी भूताच्या किंवा Horror कहाण्या त्यांना विचारायचो तेव्हा ते या बोर्ड बद्दल भरपूर काही सांगायचे. तेव्हा मला त्यांचं नवल वाटलं नव्हतं. पण आत्ता कळतंय की त्याचा दुवा या वड्यासोबत जुळतो आहे. शिवाय मी इंटरनेटवरही त्या बोर्डचा थोडाफार अभ्यास केला होता. आणि उरली गोष्ट तुम्हा दोघांच्या स्वप्नांची. तर तुमच्या स्वप्नांमध्ये वेळ काय होती? म्हणजे सकाळ होती का रात्र होती?" तेव्हा साक्षीने सांगितलं की तिच्या स्वप्नामध्ये दुपारची वेळ होती. मात्र राहुलच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या स्वप्नामध्ये रात्रीची वेळ होती. यावरून आमच्या हे लक्षात आलं की त्या दोघांचेही स्वप्न सलग नव्हते. आणि मधल्या वेळेमध्ये काहीतरी घडणार होते. इतक्यात राहुल पुन्हा म्हणाला, " एक... Second... माझ्या स्वप्नामध्ये सलोनी नव्हतीच...! फक्त आपण सहाच जण होतो. मग नक्की त्यावेळी सलोनी कुठे गेली असणार?" त्यावर साक्षी म्हणाली, "ती कुठे गेली होती हे मला माझ्या स्वप्नात दिसले होते. त्या खोलीमध्ये जेव्हा आम्ही दोघी गेलो. तेव्हा इकडे तिकडे पाहून मी दरवाजाची कडी उघडायला दरवाज्यापाशी आले. तुम्ही दरवाजाच्या दुसर्या बाजूस होता आणि सलोनी माझ्यामागे होती. जेव्हा मी दरवाजा खोलला तेव्हा अचानक तुम्ही ओरडलात...'भूत' आणि कोणीतरी मला पाठीमागून धक्का दिला. त्यामुळे मी खोलीच्या बाहेरच्या बाजूस पडले आणि खोलीचा दरवाजा अचानक बंद झाला. सलोनी आत मध्ये त्या खोलीतच अडकली. आणि तुम्ही अचानक ओरडला होता कारण सलोनी च्या पाठीमागे तुम्हाला कोणते तरी भूत दिसले होते." हे ऐकून सलोनी रडायला लागली. ती फारच घाबरली. निश्चितच असं स्वप्न ऐकल्यावर कोणालाही रडू येणार... आणि तेही असं जे आपल्या सोबत घडणार आहे हे नक्की आहे. मात्र या सर्वांवरून आम्हाला एक गोष्ट कळली होती की साक्षी आणि राहूल या दोघांच्या स्वप्नांमध्ये सलोनीने पाहिलेले स्वप्न घडणार होते. आम्ही सलोनीला शांत केलं. ती रडायची थांबली आणि तिने सुद्धा तिचे स्वप्न सांगण्यास सुरुवात केली, "मी... मी बेशुद्ध अवस्थेत पडले होते. मला कोणीतरी हातापायांना बांधून ठेवलं होतं. एका खोलीमध्ये मी एकटीच होती. बराच वेळ मी बेशुद्ध पडली होती. सुरुवातीला थोडा खोलीमध्ये उजेड होता मात्र हळूहळू रात्र झाली. तसे सर्वत्र काळोख पसरला. इतक्यात अचानक माझ्या शरीराभोवती मेणबत्त्या पेटल्या. थोडक्यात त्या मेणबत्त्यांच्या गोला मध्ये मी होते. जेव्हा मला शुध्द येऊ लागली. तेव्हा हे सगळं बघून मी खूप घाबरले. पण मला स्पष्ट दिसत नव्हतं. माझ्या डोळ्यांवर थोडी गुंगी होती. अचानक दोन लाकडी फळे माझ्या तोंडासमोर हवेत तरंगत आले कदाचित ते फळे म्हणजे त्या खोलीतला तो तुटका बोर्ड असावा. अचानक तो एकत्र झाला. माझ्या कानांना कोणाच्यातरी हसण्याचा आवाज येत होता. खूप वाईट होता तो आवाज... मला खूप भीती वाटायला लागली आणि जशी ती लाकडाची फळी माझ्यासमोरून बाजूला झाली कोणीतरी माझ्यासमोर उभं होतं. पण मला त्याचे तोंड दिसत नव्हते कारण माझ्या डोळ्यांवर गुंगी होती. तो माझ्याकडे बघून हसत होता. एकच शब्द वारंवार बोलत होता... भिती...भिती...भिती... आणि हे बोलताना आणखी जोर-जोरात हसू लागला. तेवढ्यात कुठून तरी मला तुमचा आवाज ऐकू आला. तुम्ही बोलत होता, "सलोनी घाबरू नको... अजिबात घाबरू नको... आम्ही तुला तिकडून सोडवतो" तोच अचानक ते विचित्र हसणं पुन्हा चालू झालं आणि मोठ्याने तो पुन्हा भिती...भिती...भिती...असं बोलू लागला आणि नंतर ती लाकडाची फळी हवेत तरंगत माझ्या डाव्या हाताच्या मनगटाच्या इथे गेली आणि अचानक माझ्या त्या हाताची नस कोणीतरी कापल्या सारखे मला वाटले... पण तेवढ्यातच मला जाग आली त्यामुळे मी पुढचे स्वप्न बघू शकले नाही"सलोनी पुन्हा रडू लागली. सलोनीचे स्वप्न ऐकून आम्ही सर्वजण एकमेकांकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागलो. कारण तिचं ते स्वप्न तितकंच भयानक होतं. भूतकाळात घडलेल्या काही चुका... ते वाड्यातील भूत सुधारण्याचा प्रयत्न करणार होतं ते आम्हाला आमच्या सर्वांच्याच स्वप्नामधून कळून येत होते. आम्ही सलोनीला शांत केले. सातही जणांच्या स्वप्नांना क्रमाने मांडून पाहिले. सुरुवातीस प्राची नंतर यश , मी , प्रथम , साक्षी , सलोनी आणि अखेरीस राहुल असा आमच्या स्वप्नांचा क्रम होता. थोडक्यात खऱ्या जीवनातल्या घटनांचा देखील...! प्राची आणि यश यांचे स्वप्न त्यांना सकाळी स्वप्न पडण्याआधीच घडले होते. थोडक्यात तो आधीपासूनच आमचा भूतकाळ होता. मात्र ज्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या त्या त्यांना स्वप्नात दिसलेल्या...! माझं स्वप्न मला स्वप्न पडल्यानंतरचं होतं. थोडक्यात सकाळपर्यंत तो माझ्यासाठी भविष्यकाळ होता मात्र सध्याच्या घडीला ते स्वप्न आमच्यासाठी भूतकाळंच होतं...! प्रथमचं स्वप्न...? तो आमचा वर्तमान होता. मात्र साक्षी , सलोनी आणि राहुल यांचे स्वप्न म्हणजे आमचे भविष्य होते. त्यामुळे आम्ही त्या तिघांच्या स्वप्ना कडे जास्त लक्ष देणे गरजेचे होते.
मात्र त्याही आधी एक मोठा प्रश्न होता... वाड्यातला तो माणूस ज्यांना आम्ही गोपीकाका समजत होतो तो नक्की कोण...? आणि त्यासाठी आम्हाला आमच्या भूतकाळाबद्दल विचार करणे भाग होते. त्यामुळे आम्ही भूतकाळात घडलेल्या घटना पुन्हा आठवू लागलो. कुठेतरी कोणत्यातरी गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष करतोय हे आम्हास ठाऊक होते. इतक्यात प्राची मला म्हणाली , "अन्या, तू काल रात्री झोपडी मध्ये ते फोटो बघितलेस... त्या फोटो मधला माणूस म्हणजे या वाड्यातला माणूस ना...! मग त्या फोटोच्या मागे काही अक्षरे तुला पुसटशी दिसत होती बघ... ती अक्षरे सुद्धा मला माझ्या स्वप्नात स्पष्ट दिसत होती. तिथे लिहिलेलं होतं... 'रघुनाथ गोखले'. ते ऐकून मी संपूर्णपणे स्तब्ध झालो. ही तिचं गोष्ट होती जिच्याकडे आम्ही सुरुवातीपासून दुर्लक्ष करत होतो. मात्र हीच गोष्ट सगळ्यात महत्त्वाची होती. रघुनाथ गोखले म्हणजेच गोपीनाथ गोखले यांचे वडील.... थोडक्यात गोपीकाका यांचे वडील रघुकाका...! आम्हा सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला. कारण आम्ही ज्यांना गोपीकाका समजत होतो ते दुसरे-तिसरे कोणी नव्हे तर त्यांचेच वडील रघुकाका होते. तेच रघु काका ज्यांना त्यांनीच दिलेल्या त्या ओइजा बोर्ड मधून गोपी काकांनी माणसांच्या जगात आणले होते. निश्चितच या ओइजा बोर्डची कहाणी आम्हाला त्या रघुकाकांनी सांगितली होती. मात्र आम्ही त्यावेळी त्या कहाणी वर विश्वास ठेवला. कारण त्यांनी त्यांच्या कहाणीमध्ये सांगितलेला तो फळा साक्षी , सलोनी आणि राहुल यांनी त्यांच्या स्वप्नात पाहिला होता त्यामुळे त्या फळ्याचे... थोडक्यात त्या ओइजा बोर्डचे अस्तित्व खरं होतं हे आम्हाला त्यावेळी समजलं होतंच. मात्र त्यांनी सांगितलेली ती कहाणी संपूर्णपणे खरी देखील नव्हती हे सुद्धा आम्हाला माहीत होते. कारण त्यांनी सांगितलेल्या त्या कहाणीमध्ये तो वाडा पछाडलेला नव्हता. तसेच त्या कहाणीतल्या गोपी काकांनी त्या भूताला पुन्हा पाठवून दिले होते.जे अर्थात खरे नव्हते. त्यामुळे त्या कहाणी मधल्या कोणकोणत्या भागांमध्ये सत्य आहे हे देखील आम्हाला जाणून घ्यावयाचे होते.
आम्हाला त्या वाड्यात घडणार्या आमच्या भविष्याबाबत चाहूल जरूर लागली होती. मात्र त्या भविष्यास आम्ही काही केल्या बदलू शकणार नव्हतो. आम्हाला त्या घटना जशाच्या तशा जगायलाच लागणार होत्या. त्यामुळे आम्ही सर्व आमच्या त्या भविष्यातील घटनांना सामोरे जाण्यास तयार झालो. मात्र असे म्हटले जाते गोष्टींमधला ज्ञातपणा त्या गोष्टींना बदलण्यास आपल्याला प्रोत्साहित करतो. आणि जर का आपण त्या गोष्टी थोड्यातरी बदलण्याचा प्रयत्न केला तर होत्याचं नव्हतं होऊन बसतं. आणि आमच्या नियतीतही होत्याचं नव्हतं होणे हेच लिहिलेलं होतं.क्रमशः ( To Be Continued )
YOU ARE READING
Rahasya ( रहस्य )
HorrorWelcome to story... Rahasya...! Rahasya is a horror , suspense and thriller story... The story is totally based on an idea of old castle... In story 7 children's were went into the horror castle... Horror I said bcoz it was haunted... So they just...