प्रकाश लगेच खोट्या आवेशाने म्हणाला, "ठीक आहे. चुका होतात." त्या इसमाच्या चेहऱ्यावर स्मित आले.
"कुठे आहेत कुठे मालक तुमचे?"
"बाहेर थांबले आहेत म्हणाले."
प्रकाशने साहेबांकडून त्याचं पाकीट आणि इतर सर्व सामान घेतलं आणि दाराबाहेर पडला.
प्रकाशने चौफेर नजर फिरवली. बाहेर काळाकभिन्न अंधार पसरला होता. उशीर झाल्याने घरांमधले दिवेही बंद होते. त्या माणसाच्या म्हणण्याप्रमाणे त्याचे 'मालक' बाहेरच थांबले होते. त्या मालकाला भेटायची उत्सुकता प्रकाशच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. ज्या माणसासाठी तो स्वत:च्या बायकोशी खोटं बोलून, ऑफिसला न जाता मुंबईहून नागपूरपर्यंत आला होता तो माणूस आता त्याच्या समोर येणार होता. तो पाठलाग, 'नक्की ध्येय काय' हे माहित नसलेला पाठलाग, फक्त उत्सुकतेपोटी केलेला पाठलाग आता संपणार होता. ज्या माणसाबद्दल त्याने खूप बातम्या वाचल्या , ज्याच्या बद्दल त्याला इतकं कुतूहल वाटलं, तो ज्याला भेटला..बहुतेक..तो आता त्याच्या समोर येणार होता. पण त्याच माणसाबद्दल त्याने दोन बातम्या वाचल्या होत्या. एक निधनाची तर दुसरी पंचाहत्तरीची!
ह्या सगळया प्रश्नांची उत्तरे द्यायला येणार होता, त्या माणसाचा मालक, जो प्रकाशची वाट बघत थांबला होता. पोलिस ठाण्याबाहेर.
म्हणजे..म्हणजे त्या माणसाला माहित होते की प्रकाश येणार. तो आला आहे. आपल्या घरी येऊन गेला. मालकाला हे ही माहित होते की आपल्या माणसाने त्याला पोलिसांकडे नेले आहे. कदाचित...प्रकाशने जी सावली बघितली ती त्याचीच असेल. पण मग तो बाहेर प्रकाशची वाट का बघत असेल? त्याला माहित होते की प्रकाश कोण आहे . त्याला माहित होते की प्रकाश येणार. कदाचित त्याला तेच अपेक्षित असेल. तो प्रकाशची वाट बघत होता!
हे सगळे विचार डोक्यात येऊन गेल्यावर प्रकाशची उत्सुकता अजूनच वाढली. त्याला ओढ लागली उत्तराची. त्याला पडलेल्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तराची. पण..
YOU ARE READING
अपुरी इच्छा
Mystery / Thrillerप्रकाश चांगला शिकला सवरलेला होता. चांगली नोकरी, उत्तम सहचारिणी आणि मुंबईत स्वत:चे घर. अजून काय हवे? पण तरी खोल कुठेतरी तो दु:खीच होता. तो अवघा १० महिन्यांचा असताना त्याची आई त्याच्या वडिलांना सोडून मुंबईला आली होती. आणि आजतागायत प्रकाश आपल्या वडिलां...