वंशवेल Part -1

6.1K 13 1
                                    


मंगळसूत्राशी चाळा करत मानसी खिडकीतून बाहेर बघत होती. दूपारची वेळ होती. सारा आसमंतच सूस्तावला होता. वरती आकाशात निळ्या कॅन्व्हासवर पांढर्‍या ढगांचे पूंजके थव्या थव्यांनी तूटक तूटक पणे वाहत होते. बंगल्यासमोर असणार्‍या बागेतले निरनिराळ्या फूलांचे ताटवे ऊन्हात अतिशय भडक वाटत होते. मानसीचे मन सूध्दा सध्या त्या निळ्या अवकाशासारखे होते. खूप सार्‍या भावनारूपी ढगांचे पूंजके तीच्या मनातून वहात होते. तीन महीन्यांची गरोदर मानसी भावभावनांच्या हिंदोळ्यांवर झूलत होती.

साध्या आयूष्याच्या अपेक्षेत असलेल्या मानसीने संपूर्णपणे निराळेच आयूष्य पाहीले होते. गेल्या चार सहा महीन्यांत अतर्क्य अशा गोष्टी तीच्या जीवनात आल्या होत्या. मानसी परांजप्यांच्या घरात लग्न करून येते काय आणि कोणाच्याही आयूष्यात येणार नाहीत असे प्रसंग जगते काय. जे झाले त्यासाठी तीच काय कूठलीही स्त्री आजन्म तयार नसती झाली. तो भाग प्रारब्धात असणे अटळ होते. तीची ललाटरेषा भूषणला आणि परांजप्यांच्या घरात असणार्‍या ह्या अद्वैताला येऊन मिळाली होती.

परांजपे एक मोठं प्रस्थ. कन्स्ट्रक्शन, शिपींग, टेक्स्टाईल, केमिकल्स अशा नानाविध बिझिनेसेस मधे अग्रगण्य असणार्‍या कंपन्यांचे धनी. परंतू परंपरा आणि धार्मिक श्रध्दा जपणारे लोक. जितके श्रीमंत तितकेच साधे. मनोहर परांजपेंचा एकूलता एक मूलगा भूषण. मूळचे कोकणातले असलेले परांजपे पाच सहा पिढ्यांपासून शहरात येऊन व्यवसायात पडले आणि प्रचंड यशस्वी झाले. त्यांच्या कूटूंबात एक गोष्ट होती. आजवर परांजपेंना भावकीच नव्हती. जो काही त्यांचा इतिहास होता त्यात ज्ञात असणार्‍या पिढ्यांमधे सर्वांना एकच मूलगा झाला होता. त्यांना भावंडे कधीच नव्हती. परंतू जे काही परांजपे आले ते सर्वच्या सर्व कर्तूत्ववान होते. त्यांना नेहमीच यथोचित यश मिळत गेले. पूर्वजांनी बांधलेले कोकणातले पिढीजात घर आणि त्यांच्यातूनच अनूवांशिकतेत आलेली तल्लख बूध्दी. या जोरावर परांजपेंनी प्रचंड माया कमावत व्यवसायाचे मैदान मारले होते.

वंशवेलWhere stories live. Discover now