"मी माझ्या बापाची एकूलती एक औलाद. सगळं पायाशी. गावाचं खोतपण जन्माने मिळालेलं. सारा गोळा करून राजा कडे पाठवायचा. त्यातही अपहार करायचा. माझ्या वयात आल्यापासून मला तामसी शक्तींबद्दल आकर्षण वाटू लागले होते. त्राटक, काळीविद्या, संमोहन, वशीकरण.. अघोरीबाबा बूवा. मी ह्या लोकांमधे रमत होतो.भीती हा प्रकार दूबळ्यांसाठी आहे असे मला वाटायचे. मी कशालाही भीत नव्हतो. प्रचंड साहस होते माझ्यात. म्हणूनच कोणी अशा वाटा निवडणार नाही त्या मी निवडल्या." तो बोलत होता आणि मानसीच्या डोळ्यांसमोरून काळाची पटले सरकत होती.
त्याने जगलेले आयूष्य.. केलेले गून्हे चूका. सगळे काही मानसी पाहात होती आणि तो सांगत होता. मला आधी पासून अघोरी शक्तींबद्दल विषेश आकर्षण होते. घरात सगळे माझ्या क्रोधाला घाबरत होते. विशीत आल्यावर मी सगळा कारभार हातात घेतला. वडीलांना जूमानने तर केव्हाच सोडून दिले होते. मनाच्या लहरीत जे स्वार असेल ते करायला मी मागे पूढे पाहात नव्हतो. तामसी शक्तींचे स्वतःच्या आत्म्यात आवाहन करायला दर अमावस्येला मी गावाबाहेर आरण्यात असणार्या अघोरी साधूंकडे जात असत. त्या शक्ती मिळवण्यासाठी मी द्रव्य, बळी किंवा प्रसंगी स्रीदेहाची त्या अघोर्यांची मागणी पूरी करत असे. वडीलोपार्जित मिळकती आणि अधिकारामूळे मला हे सूलभ होते. मी त्राटकविद्येत पारंगत झालो. संमोहन शिकलो. काळ्याजादूने वशीकरण करू लागलो. लोक मला घाबरू लागले. माझी बायकोदेखील माझ्या जवळ यायला दहादा विचार करत असे. अंगी बाणवलेल्या ह्या काळ्या शक्तींचे वलय माझ्याभोवती सतत असत. माझा शब्द कोणी ऐकला नाही तर त्याची राख करण्याची ताकत मी मिळवली होती. सर्व गावात माझी दहशत पसरली. पण एक गोष्ट मी माझ्या ऊन्मादात केली. त्याचे भोग मी शेकडो वर्षे भोगत आहे.
जवळजवळ एका तपाने गावातल्या विष्णूमंदीराचे महंत जगन्नाथ शास्त्री दूसर्या एका गावातल्या मंदिराचे स्थापणाकार्य संपवूण गावात परतले होते. माणूस सात्विक होता. पापभीरू, साधा आणि लोकांचे भले ईच्छिणारा होता. तो आला मला त्याच्याशी कर्तव्य नव्हते. पण त्याने माझ्या कामात लक्ष घातले आणि संघर्ष सूरू झाला.