मानसी जोरात मागे फिरली आणि दाराकडे पळाली. "आई..आई.. दार ऊघडा.. आई.. प्लिज मला बाहेर काढा प्लिज.." ती ओरडत होती.
पण तीचा आवाज वर जाणे आजिबात शक्य नव्हते. तीने कवाड ढकलले पण ते थोडेपण हलले नाही. मानसी भीतीने थरथर कापत होती. तीला त्या थंडाव्यात घाम फूटला होता. ती सतत दारावर हात आपटत होती. तीचे हात आपटून आपटून थकले. ती मूर्ती जागेवर नव्हती. आई ऊचलून नेने तर शक्य नव्हते. कारण ती बसल्या अवस्थेत दोन फूट आणि दगडी असल्यामूळे चांगलीच वजनदार होती. आईंनी ती हलवणे शक्यच नव्हते. हे विचार तिच्या मनात आले. तीने हळूच मागे वळून पाहीले. अजूनही ती जागा रिकामी होती. भीतीने तीची छाती धपापत होती. माथ्यावर घर्मबिंदू जमा झाले होते. तिच्या श्वासांचा ऐकू जिईल ईतका मोठा आवाज येत होता. ती निश्चल ऊभी होती. पण भेदरलेल्या माणसाचे मन नेहमी अंधार्या कोनाड्यांकडे वळत असते. समयांच्या ऊजेडाचा परीघ फार कमी होता. त्यांच्या पलिकडे असणार्या भिंतींच्या डाव्या आणि ऊजव्या कोपर्यांमधे चांगलाच काळोख होता. मानसी वारंवार तिथे पाहत होती.
"हि हि हि!" खूप दबलेला पण रानटी असा हसण्याचा आवाज तीच्या कानावर पडला.
ती भीतीने ताडकन ऊडाली. "कोणे?... कक कोणे?" मानसीने प्रतिसादादाखल अंधाराकडे बघत विचारले.
"हिssssहिsssहि..." परत एकदा तोच आवाज.
आता मात्र मानसी मूर्छित व्हायची बाकी होती. तीच्याखेरीज आणखी कोणी त्या खोलीत असणे हेच तीला त्यासाठी बस होते. तीने एकदा पून्हा डावीकडच्या कोपर्यात नीट निरखून पाहीले असता तीला दोन लाल ठिपके दिसले. तीन साडेतीन फूट ऊंचीवर ते ठिपके होते. मानसीला भीतीच्या लहरी मागून लहरी जात होत्या. तीचा कंठ कोरडा पडला होता. ते जे काही होते ते निश्चितच अमानविय होते.
"मानसी.. ही..ही..ही" त्याने तीचे नाव घेत परत तेच विकट हास्य केले. तो आवाज खरखरीत होता. रासवट होता. त्या हास्यात गूरगूरणे देखील सामील होते.
"कोणे...?" मानसीचा धीर खचला होता ती रडवेली झाली होते. ती दारांना दोन्ही हात लावून चिटकून ऊभी होती. तीला पापणीही लवायचा वेळ मिळाला नाही तितक्यात त्या अंधारात ते जे काही होते ते बाहेर येऊन मानसीवर झेपावले. त्याने दोन तीन ढांगातच मानसीच्या अंगावर ऊडी घेतली. मानसीने घाबरून डोळे मिटले. ते जे काही तिच्या अंगावर येत होते ते अतिशय अनपेक्षित होते. एक मोठी किंकाळी तीच्या तोंडातून बाहेर पडली. हे सर्व निमीषार्धात घडले होते. त्याने तीच्या अंगावर जात तीला खांद्याला धरून ओढली. तो अंगाने बारीक असला तरी अमानवी शक्तीचा मालक होता. त्याच्या ओढण्याने तीचा तोल गेला आणि ती पूढे जात खोलीच्या मधोमध जाऊन पालथी पडली. तरीपण ती झटकन वळाली आणि ऊताणी झाली. तीने त्याच्याकडे पाहीले.