मानसीच्या डोक्यात आघात बसून शूध्दीवर आल्यासारखी ती परत वर्तमान काळात परत आली. तो तीच्या जवळच होता.
" ओळखलेस मला मी कोण आहे? कळले तूला मी कोण आहे? जाणलेस ना आता आपण कूठल्या बंधणात आहोत? ज्या क्षणी तू लग्न संस्काराने ह्या परांजप्यांच्या घराण्याची वाग्दत्तवधू घालीस, त्या क्षणापासून मी तूझ्या माझ्या मिलनासाठी आतूर झालो. हे सर्व त्या श्रापामूळे. आता माझी सूटका जरी होणार नसली हे माहीत असले तरी ह्या वाहून गेलेल्या प्रचंड कालखंडात मी माझ्यातले तपसामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न देखील केला. मी सूक्ष्मरूपाने भ्रमण करू शकतो. पण स्थूल देहाने मला फक्त प्रणयाच्यावेळीच अवतरण करता येते. मी माझ्यातल्या काही जगाला आवडतील अशा चांगल्या गूणांची मात्रा गर्भात सोडतो. त्याने माझ्या वंशाची पूढची पिढी गूणी निघते.
मानसी. मी तूला खूप गूणवान असा पूत्र देणार आहे. फक्त माझं एकच म्हणनं ऐक. माझ्या सूटकेसाठीचा ऊःशाप खूप काळाने मी मिळवला आहे. त्यासाठी मला घणघोर तप करत खूप कष्ट पडले आहेत. माझी ती पाषाण मूर्ती फोडून माझा यथोचीत अंत्यविधी जर माझ्या वंशातल्या कूठल्याही पूत्राने केला तर ती मूक्त होईल. माझ्या दशक्रीया आणि माझ्या तेराव्या दिवसानंतर माझा जीव गती घेईल. माझे आयूर्मान संपून कैक यूगे लोटली आहेत. हा बंदीवास आता सहन होत नाही. तूला म्हणून ही गोष्ट सांगतोय मानसी. माझ्यावर दया कर. परत तूला माझा त्रास कधीच जाणवणार नाही. तू तूझ्या नवर्याला सांग तसे करायला. त्याला बाध्य कर. तूझ्या हातात आहे हे मानसी. "
त्याच्या चिरक्या आवाजातले मार्दव खरेतर मानसीच्या काळजाला घरे पाडू लागले होते.
"हो पण..तूम्ही टाम्हाला दिलेल्या पूत्रांमधे स्त्री भोगण्याची शक्ती नसते आणि म्हणून आम्हाला सतत तूम्हालाच बोलवावे लागते. तूमच्या मूक्तीने परांजप्यांची वंशवेल छाटली जाईल त्याचे काय?" मागून आवाज आला तसे दोघे जण दचकले.
"सौदामीनी तू? का आलीयेस ईथे? या वेळेला.." तो काहीसा चिडून म्हणाला.