मुक्त (भाग 2)

4.4K 5 1
                                    

विठूराया कोणत्या संकटात आणलं आहेस बाबा,यातून बाहेर यायचा मार्ग पण तूच दाखव आता.

आकाश आणी अदिती सगळ्यांसमोर आले

विक्रांत  :  मग तुमचा काय निर्णय आहे.

आकाशने अदितीकडे बघितलं, ती मान खाली घालून उभी होती,

आकाश  : मी तयार आहे लग्नाला

अदितीने चमकुण त्याच्याकडे बघितलं, आदीला खूप आनंद झाला, त्याच्या मित्रांना पण आंनद झाला,

********************************************

म्हणता म्हणता आकाश आणी अदितीच  लग्न जमलं, पूर्ण गाव होत लग्नाला जणू काही प्रत्येकाच्या घरातलच लग्न,  गावातील प्रत्येक जण कोणतं ना कोणतं काम करतच होता, आदीला तर एक काम बाकी ठेवलं न्हवत कोणी,

विक्रांत तर आपल्या होणाऱ्या जावयाची गावात किती इज्जत आहे हे बघूनच भारावून गेले होते तर विशाखाला आपला राग आवरता आवरत न्हवता कारण तिला वाटलेलं कि अदितीच लग्न एका गावठी मुला सोबत लावल कि तीच आयुष्य खराब होऊन जाईल पण झालं उलटच आकाशला तर गावात भरपूर मान, निदान हिच शिक्षण तरी बंद होईल. म्हणून विशाखा आणी तिची मुलगी जरा आनंदी होत्या.

लग्न निर्विघ्नपणे पार पडलं, आणी अदिती या घरात लक्ष्मीच्या रूपात आली.

अदिती आणी आकाश यांच्या लग्नाची आज पहिली रात्र, अदिती सजून आतल्या खोलीत बसली होती आकाश जसा आत आला तस ती उठून उभी राहिली  आकाशला तिची अवस्था समजतं होती.

आकाश  : असं दचकायला काय झालं.

अदिती  :  काही नाही

आकाश तिच्या जवळ आला, तिच अंग भीतीने थरथर कापायला लागलं, आकाशने तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवले आणी तिला बेडवर बसवल. आणी पाणी दिल, अदितीने पाणी एका वेळेसच संपवल.

आकाश   :  अग असं घाबरू नको मी तसा माणूस नाहीय
                 कि तूझ्या मर्जी विरुद्ध काहीतरी करेन,
                  त्यामुळे तु निश्चित राहा.

अदितीने त्याच्या डोळ्यात बघितलं, निळे डोळे, कधी निरखून नाही बघितलं आपण याला पण किती सुंदर डोळे आहेत याचे, खूप काही दडलेल आहे या डोळ्यांमध्ये.

मुक्त (नवीन वळणावरची) भाग 2Where stories live. Discover now