आकाश आज खूप दिवसानी मंदिरात आलेला, विठ्ठलाच्या मूर्तीकडे एकटक बघत होता.
त्याच्या तोंडून एका अभंगाच्या ओळी बाहेर पडल्या.मन माझें चपळ न राहे निश्चळ ।
घडी एकी पळ स्थिर नाहीं ॥१॥आतां तूं उदास नव्हें नारायणा ।
धांवें मज दीना गांजियेलें ॥२॥धांव घालीं पुढें इंद्रियांचे ओढी ।
केलें तडातोडी चित्त माझें ॥३॥तुका ह्मणे माझा न चले सायास ।
राहिलों हे आस धरुनी तुझी ॥४॥त्याने मागे वळून बघितल तर, महादेव
आकाश : काका कधी आलात
महादेव : आत्ताच आलोय
आकाश : काका आता जे झाल ते विसरून जा.
महादेव : प्रयत्न करतोय पण होत नाहीय.
आकाश त्यांना घेऊन मंदिराच्या पायऱ्यांवर आला आणि खाली बसत म्हणाला.
आकाश : जे हातून सुटून गेलय त्याचा विचार करण्यापेक्षा
आपल्या हातात काय उरलय त्याच्याकडे लक्ष
द्यायला हवं, नाहीतर जगणं कठीण होऊन जाईलमहादेव : हो
आकाश : हे बघा काका जी गेली तिचा विचार करू नका
तुमच्या हातात अजून दोन रोप आहेत त्यांना
मोठ करा बघा, चांगले संस्कार द्या तेच तुम्हाला
आधार देतील .महादेव : हो
********************************************
गेले काही दिवस अदिती, थोडी वेगळी वागत होती जणू तिला आकाशला काहीतरी सांगायचं होत.
चार पाच दिवसांनी
अदिती किचन मध्ये काम करत होती, पण तिच मन मात्र दुसऱ्याच गोष्टीत होत.
अदिती आकाशने तिला हाक मारली.
अदिती आपल्या विचारातुन बाहेर आली
आकाश : गेले काही दिवस झाले बघतोय तुमच लक्ष कुठे
असत.अदिती : काही नाही
आकाश : अदिती खर सांगा.