आकाश घरी आला अदिती आत मध्ये झोपली होती, त्याने बाहेरच्या खोलीत अंथरून टाकले आणी पडला.
सकाळ झाली होती अदिती जरा उशिरानेच उठली, आकाश रूममध्ये नव्हता म्हणून बाहेर आली तर आकाश किचन मध्ये काहीतरी बनवत होता, अदितीला वाईट वाटलं ती त्याच्या जवळ गेली. आकाशने तिच्या कडे बघितलं आणी
आकाश : सगळ जेवण तयार आहे तुम्ही फक्त तोंड
धुऊन या.अदिती : तुम्ही कशाला केला मी केला असता.
आकाश : सवयी बदलण खूप वाईट असत, आत्ता आहे
सवय लवकर उठून सगळे बनवण्याची.अदिती : म्हणजे
आकाश : काही नाही तुम्ही तयार व्हा.
अदिती फ्रेश होण्यासाठी गेली, तोपर्यंत आकाशने सगळं बनवल होत. अदिती बाहेर आली तस आकाश ने तिला चहा दिला,
अदिती : मस्त झालाय चहा.
आकाश फक्त हसला, त्याच्या मनाची घालमेल होत होती
आकाश : एक बोलायचं होत.
अदिती : बोला कि असं विचारताय काय. ?
आकाश :
म्हणजे, खरंच काल रात्री साठी सॉरी मला स्वतःवर कंट्रोल ठेवायला हवा होता.अदिती : राहूद्या मी विसरले सुद्धा ते सगळं.
आकाश :
तो तुमचा मोठेपणा , पण मला विसरणं होत
नाहीय म्हणून मी आज तुम्हाला एक वचन देतो.अदिती : कसलं वचन ?
आकाश : मी यापुढे तुमच्यामर्जी शिवाय तुम्हाला हात
लावणार नाही.अदिती अविश्वासाने त्याच्याकडे पाहू लागली
आकाश : खरच त्या पांडुरंगाची आन घेऊन वचन देतो.
अदितीला काय बोलाव सुचलंच नाही.
********************************************
असंच दिवस पुढे जात होते आकाश आणी अदिती यांचे एक एक विचार जुळत होते, अदितीला आकाशचा समजूतदार पणा, त्याचा रांगडा स्वभाव खूप भावत होता, वर गावात त्याच्याबद्दल असलेला आदर हेही खूप होत.