भूल भाग - १

15.8K 29 5
                                    

"आय एम सो सॉरी... मी खूप चुकलो... असा अविचारीपणा तुझ्याबाबतीत मी केला. मला खरेच माफ कर." निखिल ईशाला विनवत होता.

"इशू.. निखिल आणि आम्हालाही खूप लाजिरवाणे वाटत आहे ग. प्लिज तू आता राग सोड आणि आपल्या पिल्लूला घेऊन घरी चल." तिच्या सासूबाई मंदाताई सुद्धा तिला विनंती करत म्हणाल्या.

"इशा ! आता हट्ट सोड बाळा. आयुष्य समज आणि गैरसमजांनी भरलेले आहे. म्हणून आपण आपल्या माणसांना असं दूर करायचे नसते. निखिलना त्यांची चूक झाली याचा पश्चाताप आहे. मग उगाच का ताणतेस?" पल्लवी. ईशाची आई तिला म्हणाली.

ईशाचा मन वळवण्याचा प्रयत्न सर्वच जण करत होते. खरेतर तिच्याबाबत झालेल्या अनुचित गोष्टीमुळे ती खूपच दुखावली होती. पण त्यामध्ये निखिलचीच सर्व चूक होती असे नाही. समोर परिस्थितीच अशी उभी राहिली होती. खूपच विचित्र. ज्याचा कोणी अनुमान लावू शकत नव्हते कि असे का घडले असेल.

२ वर्षांपूर्वी इशा आणि निखिलचे अरेंज मॅरेज झाले होते. सर्वपसंतीने ठरलेल्या लग्नामध्ये कशाचीच उणीव नव्हती. ईशाचे वडील जगात हयात नव्हते तेवढीच काय ती कमतरता. पण पल्लवी म्हणजे ईशाच्या आईने छानपैकी वाढवलेल्या आपल्या लेकीला नुसते संस्कारच नाही तर स्वतःची सुंदरता आणि हुशारी पण दिली होती. निखिल ईशाचा संसार हेवा वाटावा इतका सुरेख चालू होता. एकवर्षांनी जेव्हा ती गरोदर राहिली तेव्हा तर त्यांच्या संसाररूपी कोंदणात हिराच जडला. तिची सर्वप्रकारे काळजी घेत बाळंतपण करण्यात आले. पण जेव्हा तिचे दिवस भरले आणि ती बाळंतीण झाली तेव्हा मात्र तिच्यासहीत सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली.

इशा आणि निखिल दोघेही सुंदर आणि गोरे होते. इशाला झालेला मुलगा मात्र चक्क काळा होता. एवढेच नाही तर त्याचा चेहरा ना निखिलसारखा ना ईशासारखा होता. त्याचे केस जाड आणि कुरळे होते. ललांबुळक्या चेहऱ्याचे अतिशय वेगळे दिसणारे ते बाळ डॉक्टरांनाही बुचकळ्यात टाकत होते. सिनिअर डॉक्टरांनी मत दिले कि काहीवेळा असे होऊ शकते कि बाळ आई आणि वडिलांच्या अगदीच उलट असू शकते. त्याला काहीही मेडिकल एक्सप्लेनेशन नाहीये. निखिल आणि त्याच्या घरचे खूपच निराश झाले होते. असं का झाले ह्याचा उलट सुलट विचार करण्यात निखिलचा वेळ जात होता. शेवटी त्याला ईशाच्या चारित्र्यावर संशय आला आणि त्याने एक दिवशी तिला ते बोलून दाखवले.

भूलTahanan ng mga kuwento. Tumuklas ngayon