वश भाग ३

4.6K 17 4
                                    

गणराजसाहेब स्वतः नरहरी पंडितांची माफी मागायला घरी आले होते.

"पंडितजी कसे आहात आपण." त्यांनी हात जोडत विचारले.

"गणराज साहेब मी शांत आणि प्रसन्न आहे, बोला काय सेवा?" नरहरी म्हणाले.

"माझ्या मुलाकडून झाल्या प्रकारची मी माफी मागतो. पण तुमचा आशीर्वाद आमच्यावर असावा असेच मला आत्ताही वाटत आहे." ते प्रांजळपणे म्हणाले.

"गणराज साहेब. कुठेतरी खड्डा पडला म्हणजे कुठेतरी ढिगारा हा असतोच. तो निसर्ग नियम आहे आणि त्यामध्ये आपण येऊ नये असे मला वाटते. ज्याने कुकर्म केले त्याने त्याची किंमत फेडण्यासाठी सिद्ध असावेच लागते. नियती तसे करूनच घेते. ह्यामध्ये ना कोणाचे आशीर्वाद कामी येतात ना कोणाची पुण्याई." नरहरी पंडित शांतपणे जरी म्हणाले असले तरी त्या मागचा त्यांचा करारी स्वर गणराज देशमुखांना जाणवला.

"पंडितजी. तुमच्या सारख्या ज्ञानी माणसाच्या छायेत येणाऱ्या व्यक्तीला तुमचा लाभ सतत मिळत राहिला आहे. आजवर मी तुमच्यावर दाखवलेली श्रद्धा खोटी नाही. तुमची कृपा कधीही कमी होऊ देऊ नका एवढी प्रार्थना आहे." ते नम्रतेने म्हणाले.

"मी काही श्राप वैगरे देत नाही गणराज साहेब. शांत व्हा. मी तुमच्या तारखा काढल्या आहेत. लग्न पुढील महिन्याच्या ६ तारखेला घेऊ शकता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी छानसे स्नेहभोजन ठेवा त्यासाठी तुमचे आणि मुलीकडचे कुटुंबच असू द्या. मी स्वतः येईन वधू वरास आशीर्वाद द्यायला. बस? आता तरी खात्री पटली ना?" नरहरी पंडित म्हणाले.

त्यांच्या त्या बोलांनी आश्वस्थ झालेल्या गणराज साहेबानी त्यांचा निरोप घेतला. ते गेल्यावर नरहरी पंडितांच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य पसरले. त्यांचा चेहरा हिरवट झाला.

******

भज्याचे शरीर गावाबाहेरच्या टेकडीच्या पायथ्याशी असणाऱ्या गर्द झाडीमध्ये पडून होता. त्याचा ४ फुटी देह जखमांनी भरलेला होता. गावातल्या पाटलांनी आणि त्याच्या माणसांनी त्याला यथेच्छ मारून तिथे फेकला होता. भज्या लहानपणापासून पाटलांच्या वाड्यावर हरकाम्या म्हणून काम करत होता. वयाच्या चाळीशीत असलेल्या भज्याकडून आयुष्यात पहिल्यांदाच आगळीक घडली आणि तीच त्याची शेवटची चूक ठरली.

वशWhere stories live. Discover now