भूक - शरीराची भाग~१

10.9K 32 4
                                    

प्रिया ये ना जवळ

काय करतेस?प्रत्येक वेळी काही ना काही कारण शोधत असतेस.

तुला माझ्याशी शारीरिक संबंध नाही का ठेवायचा.

तू आहे तर माझ्याच जवळ,

पण....

पण काय? प्रियाने प्रतिप्रश्न केला

मनाने आणि शरीराने भलत्याच ठिकाणी आहेस तु. केदार ने ही उत्तर दिले.

काय बोलतोस तू हे केदार,तुला कळते तरी का?

का उगाच तोंड दिले म्हणून काहीही बोलायचे.

तू फक्त तुझाच विचार करतोस.कधी मला विचारले का की तुझी इच्छा काय आहे....

मी जेव्हा शारीरिक सुखा साठी तुझी वाट पाहत असायची तेव्हा तुला तुझी दुसरी कामे महत्त्वाची होती.

एकटी एकटी तडफडत होती केदार मी,तेव्हा नाही विचार केला माझा...रागातच प्रियाने मनातील सगळं काही बोलून टाकले.....

प्रिया त्यावेळी आपले नुकतेच लग्न झाले होते.त्यावेळी घर चालवण्यासाठी पैशाची गरज होती.बाबा गेल्यानंतर सगळी जबाबदारी माझ्यावर होती.मी दिवसरात्र एक करून हे घर घेतले,बँकेत savings ठेवली ती त्याच कामातून.

आणि तू जो हा मोबाईल वापरतेस ना तो मोबाईल ही याच पैशातून आला कळले का? ....केदारही रागातच बोलला...

मोबाईल, त्याचा इथे काय संबंध.

आहे त्याचाच संबंध आहे.

ज्या ज्या वेळी माझा मुड होतो त्याचवेळी तुला तुझ्या so called फ्रेंड्स बरोबर बोलायचे असते...

अरे पण माझ्या मुडचे काय. मला आता मुड नाही.

कामं उरकून मी झोपणार आहे.

तुला झोप लागली असेल तर तुही झोप....

(आता फक्त दोघांच्या मोबाईल च्या मेसेज चा आवाज येत होता.)

इकडे प्रिया त्यांच्या बेडरूम मध्ये नेहमीप्रमाणे मोबाईलवर गप्पा मारत होती..

तर हॉलमध्ये केदारही मोबाईल घेऊन विचार करून करून थकला होता...

आज दोघांनीही त्यांच्या मनातलं सगळं बोलून मोकळे झाले होते..

विचार करत करत दोघेही झोपून गेले...

सकाळी केदार प्रियची वाट न बघता लवकर उठून ऑफिस ला तयार होऊन निघून गेला.

प्रिया थोडी उशिराच उठली.का कुणास ठाऊक पण ती थकली होती. उठून अंघोळ करून तीही सुद्धा तयार झाली.....

दिवसभराची काम उरकून,मधेच मोबाईल घेऊन मेसेज करून प्रिया तिचा वेळ घालवत होती..

कधी शॉपिंग तर कधी पार्लर मध्ये जाऊन ती up to date राहत होती...

ऑफिसमध्ये केदारचे ही मन काही रमेना पण तरीही त्याने आज जास्त वेळ ऑफिसमध्ये राहून काम करण्याचा निर्णय घेतला...खूप उशीर काम केल्यानंतर तो तडक एका बियर बार मध्ये गेला आणि रात्री जे काही झालं ते आठवून तो पित राहिला...

बघता बघता रात्रीचे एक वाजले पण प्रियाने साधा एक फोन सुद्धा केला नाही.

या रागातच तो उठला आणि तडक घरी गेला त्याचंकडे घराची चावी होतीच ,त्याच चावीने त्याने दार उघडून सरळ बेडरूम कडे निघाला..

तेवढयात त्याला प्रियाचा मादक असा आवाज ऐकू येऊ लागला....

...................................

क्रमशः

भूक-शरीराची Tempat cerita menjadi hidup. Temukan sekarang