माधवी - शृंगारकथा - 01

11.4K 30 7
                                    

जेव्हापासून माधवीला कळाले होते की तिचा पती महेश घरी परततोय व त्याच्याबरोबर संतोष सुद्धा येतोय, तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. वेगवेगळ्या प्रकारचे जेवणाचे बेत स्वयंपाक घरात बनत होते. माधवीने जवळच्याच बेकरी मधून रसगुल्याचा डबा देखील आणला होता. महेशला रसगुल्ले खूप आवडत. लग्नानंतर माधवी महेश सोबत मुंबईला राहण्यास आली होती. शहर म्हणजे काय याची कल्पना सुद्धा तिला नव्हती. नवी मुंबईतील एका एरिया मध्ये असलेल्या कॉलनीत महेशचे घर होते. महेश एका इमारत बांधकाम संस्थेत सुपरवायजर म्हणून कामाला होता. पगार ठिकठाक होता पण तो जास्त शिकलेला नव्हता. पहिल्याच वेळी त्याला मुलगी झाल्यानंतर त्याने आपली नसबंदी करून घेतली होती. अशिक्षित असला तरी समजदार होता. लग्नानंतर जोपर्यंत त्याचे उत्पन्न वाढत नाही तोपर्यंत त्याने मूल होऊ द्यायचे नाही असे ठरवले होते. माधवीला लग्नांनातर चार वर्षाने मुलगी झाली होती.

दुपारच्या वेळी माधवीला घर कसे एकदम सुनसान वाटायचे. शेजारच्या बायकांसोबत ती जास्त मिसळत नसे. नवरा आणि तिची जेमतेम एक वर्षांची मुलगी एवढाच तिचा संसार होता. त्यांचे भरपूर पाहुणे मुंबई मध्ये होते पण धकाधकीच्या जीवनात कोणीही जास्त संपर्कात नव्हते. फक्त नावाचेच पाहुणे. महेश ने तिला मोबाइल घेऊन दिला होता ज्याने ती गावी कॉल करून आपले एकटेपण दूर करायची. त्यात काल तिच्या नवऱ्याने परत येण्याची बातमी दिली होती त्यामुळे तिला थोडे बरे वाटत होते आणि संतोष येत असल्याने थोडे एकटेपण सुद्धा दूर होणार होते.

संतोष महेशच्या चुलत बहिणीने दत्तक घेतलेला मुलगा. माधवीला त्याचा चेहरा आठवू लागला. या दोघांच्या लग्नावेळी तो खूप लाजत होता. गोरापान, मोत्यासारखे चमकदार डोळे, गोबरे गाल, विस्कटलेले सिल्की केस, थोडासा गुबगुबीत असल्याने एकदम बाहुल्यासारखा दिसायचा. माधवी लग्नाला तयार होत असताना तिच्या खोलीत सर्व बायकांबरोबर तो सुद्धा होता. लाजत बायकांच्या पाठिमागे लपून पाहत होता आणि माधवीने त्याला जवळ ओढून गालावर एक पापा दिला होता त्यामुळे तो लाजून पळून गेला होता.

माधवी - शृंगारकथाWhere stories live. Discover now