मागील भागात आपण माधवीच्या निरस व कंटाळवाण्या जीवनाबद्दल वाचले. तिच्या आयुष्यात कसलीही एक्साईटमेंट नव्हती. पण संतोषचे काय? त्याची लाईफस्टोरी काय होती? मुंबईत येण्याआधी त्याच्या डोक्यात काय विचार चालले होते आणि मुंबईत पाय ठेवल्यापासून त्याच्याबरोबर जे घडत गेले ते त्याच्याच Point of View ने पाहुयात..
संतोष हा एक ऑर्फन म्हणजेच अनाथ मुलगा होता. महेशच्या चुलत बहिणीने तिला मुल नसल्याने संतोष 2 महिन्याचा असतानाच अनाथाश्रमातुन दत्तक घेतले होते. महेशची चुलत बहिण आणि तिचा पती तो 2 वर्षाचा असतानाच बस ॲक्सिडेंट मध्ये वारल्याने त्याला लहानाचा मोठा महेशच्या आज्जीनेच केले होते. तो लहानपणापासूनच किंचीत लाजरा, कमी बोलणारा असा होता. त्याच्या जिम ला जाणा-या मित्रांमुळे व्यायामाची आवड निर्माण झाली होती. रोज संध्याकाळी शाळेतुन येताच पाण्याने भरलेली बाटली व नॅपकीन बॅगमध्ये घेवुन जिमला जायचे आणि ग्राऊंडवर काही मिनिटे फेरी मारल्यानंतर पायांचा व्यायाम, पोटावरील ॲब्ज आणि वजने उचलत दंडाचा व्यायाम करणे ही त्याची सवयच झाली होती.
एकही दिवस खंड न पाडता सातत्याने व्यायाम करुन उंची व शरीरयष्टी थोडी मजबूत झाल्याने त्याच्या जिम प्रशिक्षकांनी संतोषला एक सल्ला दिला आणि तो म्हणजे भविष्यात आर्मी किंवा मर्चंट नेव्ही जॉईन करणे. संतोषला पोहणे खुपच आवडायचे. त्याला मिळालेल्या सल्ल्यानुसार तो रोज थोडा वेळ काढून मर्चंट नेव्ही बद्दल माहिती गोळा करण्यासाठी शिक्षकांना भेटत होता. त्याच्या एका शिक्षकांनी त्याची मर्चंट नेव्ही कडे असलेली ओढ पाहत त्याला बारावीची परिक्षा झाल्यानंतर मुंबईत जाऊन ट्रेनिंग घ्यायला सांगितले.
मुंबईचे नाव ऐकताच संतोष मनात थोडा खुष झाला होता. मुंबईत जायची त्याची लालसा खुप होती. त्याने मुंबई फक्त मोठ्या पडद्यावर सिनेमातल्या दृष्यातच पाहिलेली. पण मुंबईला एकटे जाणे म्हणजे खर्चाचा विषय आला. तो कॉलेजनंतर मिळत असलेल्या वेळेत लहान मुलांचे क्लासेस घेऊन काही पैसे जमा करु लागला. बारावीच्या परिक्षेनंतर त्याने आपला मुंबईला जाण्याचा बेत आजीसमोर बोलून दाखवला. वर हे पण सांगितले की त्याने गेल्या दोन वर्षात थोडे फार पैसे बॅंकेत जमा केले आहेत त्यामुळे आजीला खर्चाची चिंता करायची काहीच आवश्यकता नव्हती.
![](https://img.wattpad.com/cover/264406757-288-k362691.jpg)
YOU ARE READING
माधवी - शृंगारकथा
Romanceलग्नानंतर माधवी किती वेळा तरी त्याला पकडायची आणि गालावर हलकेच चावा घेत किस करायची ज्यामुळे तो कायम रडायचा आणि मग माधवी त्याला चॉकोलेट देऊन मनवायची. एकदा तर संतोष त्याच्या भोळ्या स्वभावाचे प्रदर्शन देत सर्वांसमोर म्हणाला होता की, "मी मोठा झाल्यावर तु...