दुसऱ्या दिवशी सकाळ होताच संतोष उठुन बसला. ठरल्या प्रमाणे आज महेशसोबत मुंबईतील एका भागात जायचे होते. महेश त्याचा मालक जो एक बिल्डर होता, त्याच्या ओळखीने संतोषच्या ॲडमिशन साठी एका प्रशिक्षकाला भेटणार होता. काहीही करुन त्याला हे काम करावे लागणार होते. हे काम झाले नसते तर ॲडमिशन साठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागला असता किंवा मग डोनेशनच्या नावाखाली टेबलाखालून लाच देऊन काम करवुन घ्यावे लागणार होते.
सकाळचा नाश्ता आवरुन संतोष आणि महेश दोघेही बाईकवरुन निघाले. मुंबईत आल्यापासून संतोष ने आतापर्यंत चाळीच्या आजुबाजु असलेल्या भागाशिवाय इतर कुठेही पाऊल ठेवले नव्हते. इतक्या सकाळी देखील रस्त्यावर ट्राफिक आणि गर्दी पाहून संतोषला विचित्र वाटू लागले. जसजशी बाईक पुढे जाऊ लागली तश्या उंचच उंच अशा काचेच्या चमकणाऱ्या बिल्डिंग्स संतोषला आकर्षित करू लागल्या आणि त्याला का कुणास ठाऊक मनात विचार येऊ लागले की मुंबई खरंच उच्चभ्रू आणि अगदी हाय फाय मॉडर्न लोकांची आहे, इथे आपला निभाव लागणं कठीण आहे. असा विचार करतच तो आजुबाजुला पाहत निरिक्षण करत होता. थोडं पुढे जाताच महेशने आपली बाईक चौकातल्या सिग्नलला थांबवली. सिग्नलवर लाल रंगाचा टायमर चालू झाला.
तेवढ्यात ... "ए चिकने.. दस रुपया दे ना.." - बाईकच्या मागून येत संतोषच्या पोटात आपला बोट घुसवत एका तृतियपंथ्याने त्याला डिवचले. अचानक झालेल्या स्पर्शाने संतोष एकदम घाबरला कारण हा प्रकार त्याला अगदी नवखा होता. त्याने मागे बसुनच महेशचा खांदा घट्ट पकडला.
"अरे यांना काय घाबरतोस.. हे लोकं तुला मुंबईतल्या प्रत्येक सिग्नलवर भेटतील.." - म्हणत महेशने हसतच आपल्या वॅलेटमधुन दहाची नोट काढत त्या तृतियपंथ्याच्या हातात सरकवली. तसा तो आणि त्याची गॅन्ग टाळ्या वाजवत पुढे निघुन गेली. संतोष त्यांना पाहतच होता तोच त्याला गळ्यात भडक लाल रंगाचा रुमाल बांधुन काही युवक रस्त्याच्या बाजुला उभे दिसले. ते सर्व युवक एखाद्या मूव्हीतील हिरोप्रमाणे दिसत होते. गोरेपान, उंच, ॲथलेटिक बॉडी असलेले ते सर्वजण येणाऱ्या चारचाकी गाड्यांकडे पाहत उभे होते, जणुकाही कुणाची तरी वाट पाहत आहेत.
ŞİMDİ OKUDUĞUN
माधवी - शृंगारकथा
Romantizmलग्नानंतर माधवी किती वेळा तरी त्याला पकडायची आणि गालावर हलकेच चावा घेत किस करायची ज्यामुळे तो कायम रडायचा आणि मग माधवी त्याला चॉकोलेट देऊन मनवायची. एकदा तर संतोष त्याच्या भोळ्या स्वभावाचे प्रदर्शन देत सर्वांसमोर म्हणाला होता की, "मी मोठा झाल्यावर तु...