निराला झोप लागत नव्हती ती उठली आणि किचन मध्ये गेली , निराने तिची लाल रंगाची नाइटी घातली होती .. तिने कॉफी बनवायला सुरुवात केली पाणी उकळत होतं .. तिला ब्लॅक कॉफी आवडायची .. तेवढ्यात शिराज तिथे आली आणि निराच्या पाठीवर बोटाचा एक ओरखडा काढला आणि तिला घट्ट पकडून उभी राहिली.
ये काय करतेस अशी तू ? नीरा तिला लडिवाळ पणे दूर सारत म्हणाली
तरी पण शिराज दूर ना जाता तिच्या जास्त जवळ आली आणि तिच्या गालावर टिचकी मारत म्हणाली खूप हॉट आहेस ग तू ..
हो का ?
खरंच.. तुला माहित आहे ते
मस्ती मस्ती मध्ये कॉफी उकळली आणि त्यांनी ती कॉफी घेऊन गॅलरीत ठाण मांडलं
शिराज बोलत होती ... दुबईच्या हाय क्लास कुटुंबात जन्म झालेली शिराज ... वडिलांचा व्यवसाय आईचं ऑफिस आणि त्यातून दोघांचे होणारे वाद ..कुटुंबाचं असच असते .. आपल्या कपड्यांसारखं .. जिथे दिसत नाही लोकं वाकून बघतात आणि जिथे दिसते तिथे लोकं ढुंकूनही बघत नाही... कोणी कोणाशी जुळवून घ्यायला तयार नव्हतं रोज रात्र झाली कि भांडण .. मला रात्री कठीण जाऊ लागल्या मग एक सोयीस्कर मार्ग शोधला .. रात्री मित्रांशी बोलत कधी पार्टी करत कधी कुठे लॉन्ग ड्राईव्हला जात घालवायची .. दिवस कॉलेज मध्ये निघून जायचा .. पण त्याचही कुणालाकाही सोयीसुतुक नव्हतं .. हळू हळू मी कुटंबापासून दूर जात गेलीआणि एकदा मी मुंबईला आजीकडे आली मग तिथेच राहिली.. आजी माझी लाडाने काळजी करत होती आणि तिला पण माहित होतं पण ती पण काही कुणाला बोलू शकत नव्हती.
मी हळू हळू मुंबईकर होऊ लागले .. मला इथंही बरेच मित्र मिळाले पण मी कुणाला लळा लावण्याचा प्रयत्न नाही केला जसा माझा फॅशन डिझाईनिंग चा निकाल आला मी लगेच नौकरीला लागली .. मग स्वतःला फॅशन मध्ये गुंतवून टाकलं .. मात्र कुठे तरी मनात ती सल राहिली कि आपण कुणाला जास्त महत्वाचं नाही राहिलो .. कधी आई बाबा आले म्हणाले चाल दुबईला तिथे छानशी नौकरी मिळेल .. पण मीच नको म्हणाले .. आता कंटाळा येतो त्या दुबईचा तेथील त्या वादाचा आणि त्यातून होणाऱ्या फरफटीचा ..
मी इथे मग रमत गेली .. कधी कुणाशी झालेली मैत्री मी जपण्याचा प्रयत्न केला पण मला कधीच यश नाही मिळालं कदाचित लोकांनी माझ्याकडून बाकी गोष्टीच अपेक्षित ठेवल्या आणि माझ्या मनाची नेहमीच उपेक्षा केली ..
शब्दनें तुलाकधी कॉन्टॅक्ट नाही केला गेल्यावर ? नीरा ने विचारलं ?
BINABASA MO ANG
सहवास ( श्रृंगार कथा -18+ )
Romanceनीरा एक करीयर ओरीएंटेड मुलगी .. तीच्या आयुष्यात आलेल्या वादळाची श्रृंगार कथा