रूम मस्त होती .. मंद दिव्याच्या झोतात चमचमती ... एक सुंदर लुसलुशीत बेड .. एक छानशी गॅलरी ... एक मस्त फ्लॉवर बेड .. मंद संगीत ... रेड वाईन ची बॉटल ...सर्व बांध सुटलेले नखशिखांत प्रेमात भिजलेले ... ती आणि तो .. एक मावळता सूर्य आणि उगवता चंद्र ... आणि तोच सहवास प्रत्येकाला हवा हवासा ... प्रत्येकाला ना सांगता येणारा .. कि तो सहवास हवा आहे म्हणून ... त्या दोन प्रतिकृतीतून .. सहज फुलणारा तो मद्यधुंद सहवास ....
पहाटवारा वाहत होता .. शब्द उठला आणि त्याने निराला उठवलं .. चल निघायला हवं ..
थांब मी सोडते तुला एअरपोर्ट ला
नाही नको .. जावंसं वाटणार नाही .. शब्द ने मान खाली घालून नीराला म्हटलं .. तू आराम कर मी निघतो ..
मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल २ वरून शब्द ने आपलं सेक्युरिटी चेक केलं आणि तो ऑनबोर्डींग प्रोसेस कडे गेला .. जाताना त्याला प्रीमियम लाउंज मध्ये जायची परमिशन होती म्हणून तो त्यात गेला आणि त्यातून तू येणाऱ्या जाणाऱ्या विमानाकडे बघत बसला त्याच्या हातात एक रेडवाईन चा ग्लास होता आणि त्यात ती निराला बघत होता ..
शब्द स्वतःच्या कामा बद्दल खूप पॅशिनेट होता त्याला काम केल्याशिवाय चैन पडत नव्हती .. आता फ्रांकफोर्ड ला गेल्यावर आपण काय करू हा त्याच्या समोर खूप मोठा प्रश्न होता .. कारण त्याच्या दिवसातील १८ तास कामात जायचे तो श्वास घ्यायचा तर कामाच्या तालावर .. जेवण त्याने कधीही शांतपणे नाही केलं .. त्यातही त्याच्या टॅब वर त्याचे कामाशी चाळे चालू असायचे .. फॅशन जगायचा तो .. कुणाला कसा ड्रेस आवडेल हे तो त्या माणसाच्या हालचालीवर ठरवायचा .. दुकानात काय विकेल ह्याचे ठोक ताळेबंद बांधणे हे त्याच्या डाव्या हाताचा खेळ होता .. १ करोड वरून कंपनीला ३५०० करोडवर नेताना त्याने आपल्या महत्वाच्या क्षणांना मूठमाती दिली होती . कित्येक रात्री झोपेविना काढत कित्येक दिवाळीला ऑफिस मध्ये डोळ्यांच्या पणत्या जाळत .. कित्येक संडे आरामाच्या क्षणी दुकानांमध्ये फिरून कुठला प्रॉडक्ट का विकला जात नाही ह्याचं विश्लेषण करत .. तर कधी दुकानात माळ पोहचला पाहिजे म्हणून स्वतः ट्रक लोड करत तो इथवर पोहचला होता .. कधी कधी सकाळी पाच वाजता जाऊन दोन दोन दिवस घरी ना येता उपवासही घडला डगमगता काहीही जी मिळेल ते खात किंवा चहा पिऊन आपलं काम करत ह्या कंपनीचा रेटा समोर नेत ठाम पने उभा ठाकलेला शब्द शृंगारपुरे .. आज तेवढाच हवालदिल होता ..
YOU ARE READING
सहवास ( श्रृंगार कथा -18+ )
רומנטיקהनीरा एक करीयर ओरीएंटेड मुलगी .. तीच्या आयुष्यात आलेल्या वादळाची श्रृंगार कथा