संधी भाग 1 (अनपेक्षित)

18.7K 39 31
                                    

"आईच्या गावात.. कसं शक्य आहे राव... ह्या बारक्या शेमण्याला ही परी कशी मिळाली. तिच्यायला कॉलेजला जाऊन शिकला म्हंजी काय लै मोठा दांड्याचा झाला का.. पुचाट कुढंलचा...अजून माझ्याबरबर डोळा भिडवता येतं नाय साल्याला.. तोंडावर मिशी बी नीट नाय आन असली भारी पोरगी सोयरीक म्हून याला मिळाली." दारू सोबत राग गिळत नाम्या त्याच्या दारू मित्राला सांगत होता. देशी दारूच्या अड्डयावर बसून त्याच्याच सारख्या आणखी एका गुंडवजा मित्रासमोर तो भडास व्यक्त करत होता.

नाम्याच्या बायकोचा आते भाऊ म्हणजे निशांतचे नुकतेच लग्न झाले होते. निशांत एका MNC मध्ये कामाला होता तर त्याची नवपरिणीत पत्नी प्रिया एका मोठ्याश्या NGO काम करत होती. तसं निशांतचे उत्पन्न व्यवस्थित होते. शिवाय त्यांची स्वतःची अशी एक चाळ पण होती. त्याचे भाडे वडिलांची पेन्शन वैगरे. आर्थिकरित्या भक्कमपणा होता. प्रिया एक करियरिस्ट मुलगी होती. MBA झालेली प्रिया तिच्यात कामात झोकून देणे पसंत करत होती. आयुष्यात स्वतःची वरची जागा निर्माण करण्याचा तिचा पहिल्यापासून निर्धार होता.

स्वभावात मृदुता, कनवाळू पणा आणि मेहनत करण्याची इच्छा हे गुण, तर दिसण्यात जणू एखादी चंचल हरिणी. उंच शेलाट्या बांध्याची प्रिया बघणाऱ्याच्या काळजाचा ठाव घेत असे. मन मोकळ्या स्वभावामुळे ती नेहमी हसतमुख असायची. सहज कोणाशीही बोलायला तिला वावगे वाटत नसे. हसताना गालावर पडणारी एकच खळी समोरच्याला दंग करून टाकत असे. लग्नाआधी तिचे 2 बॉयफ्रेंड होते. पण काही कालांतराने तिचं त्यांच्याशी जमलं नाही. तेव्हा पुढे या भानगडीत न पडता तिने धोपट मार्ग निवडत घरच्यांनी आणलेल्या स्थळाशी जुळवून घेतले. तसें निशांत सारखा शांत आणि समंजस स्वभावाचा जोडीदार मिळाल्याबद्दल ती तशी खुश होती. तो देखील तिला अगदी साजेसा होता. सुशिक्षित आणि सुसंस्कृत. कोणाच्याही मदतीला धावून जाणारा. पण काहीसा मितभाषी आणि घाबरट स्वभावाचा असा. त्याचा सभ्य, शांत मृदू स्वभाव तसा पहिला तर वरकरणी प्रियाला ठीक वाटत होता पण प्रत्येक गोष्टीत समोरच्याची परवानगी मागूनच ती करने इतक्या लेव्हलचे सभ्य आचरण तीला पटत नव्हते. त्याच्या अशा वागण्याने त्याच्यात तीला तो कणखर पुरुष दिसतं नव्हता जो तीला खोलवर आवडत होता.

संधीWhere stories live. Discover now