बदला (भाग 1)

487 2 0
                                    

तो ऑफिसमधून बाहेर पाडला. गाडी पार्किंगमधून काढली मागे बॅग अक्षरशः फेकली. कोट व टाय काढून मागच्या सीटवर टाकला. ड्राइवर कडचं दार उघडून आत बसला. सिगारेट पाकीट काढलं. लायटर काढला. मस्त सिगारेटचा झुरका मारला. परत दुसरा.... डोकं जरा हलकं झाल्यासारखं वाटलं. गाडी स्टार्ट केली. शिताफिने पार्किंग बाहेर काढली. आता कोठे जावे हा विचार करु लागलो. तेव्हड्यात बायकोचा फोन आला...

हॅलो.. कुठे आहात.. कामच...करताय.. की कुणा बरोबर शेण खात फिरताय?  कोण आहे बरोबर?

खरं तर श्रीकांतला खूप राग आला होता. पण त्याने औंढा गिळाला, म्हणाला.. मी एकटाच आहे. घरी यायला निघालोय. पाहिजेतर व्हिडीओ कॉल कर...

नको.. नको.. तिला सीट खाली लपवाल. तुमची सगळी थेरं माहित आहेत मला कळलं!

श्रीकांतने धाडकन फोन आपटला. समोर लक्ष गेली तर एक स्कूटर अगदी त्याच्या समोरून येऊन गाडीवर धडकणारच होती. त्यांनी कसं स्टेरिंग वळवलं कुणास ठाऊक पण स्कूटर साईडनी येऊन त्याच्या गाडीला धडकली. गाडीला चांगलाच पोचा आला असणार म्हणत तो वैतागूनच उतरला. मागे वळला. बऱ्यापैकी अंधार होता. त्याने मोबाईलचा लाईट पेटवला आणि जवळ गेला.

ती एक स्त्री होती. ती खाली आडवी आणि तिच्यावर गाडीचं ओझं होतं.

त्याने पटकन गाडी उभी केली. तिला हाक मारली मॅडम तुम्ही ठीक आहात ना? कुठे लागलं तर नाही ना?

ती पटकन उभी राहिली. खळखळून हसली. नाही साहेब मला तसं काही फार लागलं नाही पण तुम्हाला बघून माझं दिलं मात्र धडकायला लागलंय.

ती पुन्हा हसली. आता हसताना मी तिला निरखून पाहात होतो. मोबाईलच्या उजेडात तिचा चेहरा, चेहऱ्यावरील हास्य आणि रेखीव दात, नाजूक पाताळ ओठ आणि त्यावर लावलेली पुसट गुलाबी लिपस्टिक दिसून आली.

तिने तिच्या स्कूटीच हॅण्डल हलवून बघितला. किल्ली फिरवून गाडी स्टार्ट केली. गंमत म्हणजे ती स्टार्ट ही झाली. मी वळलो गाडीचं दार उघडू लागलो. तिने ओ हॅलो करतं मला थांबवले. आहो मी निघाले नाही. गाडीची कंडिशन चेक करतं होते. चालली नसती तर तुम्हालाच मला लिफ्ट द्यावी लागली असती आणि घरी सोडावं लागलं असतं.

बदला Onde histórias criam vida. Descubra agora