बदला (भाग 2)

251 1 0
                                    

सकाळ नेहमी प्रमाणे उजाडली. मी उठलो. नेहमी प्रमाणे फिरायला गेलो. व्यायाम केला. घरी आलो.तिचा चहा तयार होता आणि तो पुन्हा गरम करण्यासाठी ती माझी वाट बघत होती. मी आल्याचं तीने पाहिलं मग टेबलावर बिस्कीट, म टा वर्तमानपत्र आणि पाणी ठेवलं.  मी बसलो. पाणी प्यायलो. तेव्हड्यात तिने चहा आणला. मी चहा बिस्कीट खात पेपर वाचला. उठलो स्वतःच आवरलं. कपडे चढवले. सॉक्स घालत असता तिने नाष्टा आणला.

आहो! रात्री थोड उशिरा आलात तरी चालेल पण स्मशाना जवळच्या रस्त्याने मात्र येऊ नाका.

मी यावर काही उत्तर देणार होतो पण स्वत:ला आवरले. बरं नाही येणारं म्हणत गाडी स्टार्ट केली पार्किंग मधून बाहेर काढली आणि थेट ऑफिस गाठल.

दिवसभर ऑफिसमध्ये खूपच काम होती. वेळ कसा गेला समजलाच नाही. फोन वाजल्यावर भानावर आलो. घड्याळ बघितले. संध्याकाळचे सात वाजून गेले होते. मी उठलो बॅग अवरली. वाशरुमकडे जाऊन आलो. फोन खणखणत होता. बायकोचा फोन होता. निघालात का?

हो निघतोय.

डायरेक्ट घरी येणार? की बारमध्ये जाऊन?

तुला काय वाटतं! मी काय करावं?

काहीही करा. घरी उशीरा या पण स्मशानभूमीच्या जवळून येऊ नका. इतकीच विनंती... ठेवते फोन.

ही काय भानगड आहे मला काहीच कळेना. काल पर्यंत कधीही मार्दव्य असलेल्या भाषेत न बोलणारी बायको आज इतकी मृदूभाशी कशी झाली कळेना. जाऊ दे.. कधी कधी.. मनात विचार येतात ना येतात तो ती समोरून आली. गाडी थांबवली. मी ही गाडी थांबवली. उतरलो.. तिच्या जवळ गेलो. ती गोड हासली. कुठे निघालीस? ... मी..

तुलाच भेटायला.. आणि कुठे जाणार?

मला? का? आपली काही ओळख आहे का?

हो ! आपली जन्मो जन्मीची ओळख आहे. कदाचित तुला माहीत नसेल पण मला माहीत आहे.

तुला कशी काय?

आज नाही पण लवकरच सांगिन. चल जरा तूझ्या गाडीतून चक्कर मारू.. म्हणतं तिने स्कूटर साइडला लावली. लॉक केली. डाव्या बाजूच दार उघडून आत बसली. चला सरळच हाय वे ला लांब जाऊया.

बदला Onde histórias criam vida. Descubra agora