मी जागा झालो. डोळे उघडून समोर पहिले समोर ती स्कुटरवाली आणि माझी बायको उभ्या होत्या. दोघी डोळे फाडून माझ्याकडे पहात होत्या.
काय बर वाटतंय का आता?... बायको म्हणाली.
मी काहीच बोललो नाही.
त्या तुमच्या मित्रानी राजूनी तो गोसावड्या कशासाठी आणला होता?
बायको रागाने पहात मला विचारू लागली.
आता ती नॉर्मलला आली हे मनात येऊन मी हासलो.
हसायला काय झालंय... कुत्र्यानी फाडलं तरी जिरली नाही का?
खरं सांगू का? का कुणास ठाऊक पण तुम्ही दोघी मागच्या जन्मीच्या सवती असाव्यात असा मला भास होतोय.
मी सहज बोलून गेलो पण दोघी चमकल्या.. एकमेकिंकडे बघू लागल्या. काही बोलणार होत्या तोच चंदनाचा सुगंध सगळीकडे दरवळू लागला.
ए तो गोसावडा येतोय. चल आपण पुन्हा येऊ...
हे बघा त्या गोसावड्याशी जास्त जवळीक करु नका आधीच सांगतेय. येते मी....
बापरे हे काय आहे?
माझी बायको आणि स्कूटरवाली दोघीही एकदम बोलल्या. राजूला सांगा पुन्हा त्या गोसावड्याला इथे आणलेस तर परवा ज्या कुत्र्यांनी तुला फाडलं तिचं कुत्री त्या राजूच हाड ही शिल्लक ठेवणार नाहीत. येतो आम्ही.
आता मला आठवले.. मी पार्किंगला गाडी लावतं होतो तेंव्हा ते दोन जंगली कुत्रे आले. आधी मी घाबरलो होतो पण जेंव्हा ते शेपूट हालवत माझे पाय चाटत होते तेंव्हा मला आश्चर्यच वाटलं. मी त्यांच्या अंगावर हात फिरवणार तेव्हड्यात मागून स्कूटरवालीला येताना पाहिलं आणि अचानक ती कुत्री पिसाळली आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला. मी चांगलाच घाबरलो होतो आणि पुढे काय झाले कळलेच नाही.
महंतना घेऊन राजू आला.
मी उठण्याचा प्रयत्न केला पण शक्य होतं नव्हतं.
BINABASA MO ANG
बदला
Horrorपिशच्य योनीतून माणसात जन्म घेऊन त्यांनी एकमेकांचा बदला घ्यायचा प्रयत्न केला.