(मी टेबलावर आलो.. खुर्ची ओढून जेवायला बसलो. जेवणं झाल... बेडरूम मध्ये गेलो. गोळ्या घेतल्या. तेव्हड्यात ती अवरून आली. आल्या आल्या म्हणाली...
आज ही स्मशानात गेला होतात ना? तुम्हाला मरायची इच्या झालेय का?.....)वाटल होत काहीतरी बोलावं. पण उगाच काही बोलायला जावं आणि तीने उकरून भांडण काढावं त्या पेक्षा नकोच. म्हणून मी गप्प बसलो.
तरीही बायको....तुम्ही स्मशानात गेला होतात ना? अस का विचारते? तुम्हाला मरायची इच्छा झालेय का? असं का म्हणते ?
मला काहीच कळेनासे झाल होत. पहिली गोष्ट म्हणजे ती कधीच गोड बोलायची नाही. सदानकदा कावलेली असायची त्यात ही स्कूटरवाली गेली दोन दिवस भेटू लागली...तिला भेटून घरी गेल्यावर बायकोला स्मशानातला वास येतो हे काय गौडबंगाल असावं!
माझं तर डोकंच चालेनास झालं. मी विचार करायचा आणि हे आवघड गणीत सोडविण्याचा नाद सोडला. मस्त ताणून दिली. सकाळी नेहमी प्रमाणे जाग आली. नेहमी प्रमाणे आवरल व ऑफीसला जायला निघालो.
काय हो, आज नेहमी प्रमाणे येणार की उशीरा ?
मी काहीच बोललो नाही कारण आत्तातरी माझा काही ही
प्लॅन नव्हता. पाहू.बंगाल आहे. जाऊन तरी पाहू या.मी गाडी स्मशानाकडे घेतली. आत प्रशस्त पार्किंगसाठी
जागा होती स्मशानाचा परिसर खुप मोठा होता. अनेक झाडं
त्या परिसरात होती. झाडांवर पाकोळ्या, कावळे गिधाडे यांच वास्तव्य असावं अस दिसत होत कारण त्यांच्या विष्टा निरनिराळ्या ठिकाणी दिसत होत्या. एक अॅब्युलन्स सायरन वाजतन आपली कदाचित ती अँब्युलन्स नसून प्रेत घेऊन येणारी गाडी असावी काही माणसं तिच्या मागे धावत येता ना दिसत होती दोन प्रेत लकडावर जळत होती. दोन डिझलच्या
भट्टीत जळून राख होण्याची वाट पहात होती.
मला हसू आलं की मेलानंतर ही माणसाच्या आयुष्यातून रांग काही जात नाही.मी एखाद्या बागेत फेरफटका मारावा तसा त्या स्मशानात फिरून सर्व परिसर न्याहाळून पाहीला. इथे कुठेही मला
कोणताही विचीत्र वास जाणवला नाही. मग बायकोलच हा स्मशानातला वास कसा काय येतो -- किंवा तो माहित आहे ? काही कळत नाही.
VOCÊ ESTÁ LENDO
बदला
Terrorपिशच्य योनीतून माणसात जन्म घेऊन त्यांनी एकमेकांचा बदला घ्यायचा प्रयत्न केला.