मी युसुफला पाहून थोडी भांभवले. पण लगेच त्याला आत घेऊन मी दार बंद केले. मी त्याला बसण्यास सांगितले. आत जावून मुलांकडे पाहिले तर मुले गाढ झोपी गेली होती. मी बेडरूमचा दरवाजा लावून बाहेर आले.
" अरे यावेळी तू अचानक कसा इथे आलास.", मी युसुफला चकित होऊन विचारले.
" अग मी का आलो ते तुला कळेल थांब!", युसूफने मला असे बोलल्या बोलल्या माझा फोन वाजला.
मी पाहिलं तर सुरेशचा फोन आलेला. मी थोडी घाबरली पण धीराने फोन उचलला." हॅलो, बोला.", मी फोन उचलून बोलले.
" अग युसुफ येईल थोड्या वेळात आणि काही पैसे देईल तुझ्याकडे तेवढे घेऊन ठेव.", सुरेशने मला निरोप देऊन फोन ठेवला.
माझ्या लक्षात आले की मुद्दामून हे कारण काढून युसुफ घरी आला होता. माझा फोन झाल्यानंतर तो माझ्याकडे बघून मिश्किल हसला. मी थोडे मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहिले. त्याला बसायला सांगून मी आत चहा करायला गेले. मी चहा बनवण्याची तयारी करू लागले. मी अजून साडी मध्येच होते. मी कामात व्यस्त असताना अचानक मागून युसुफ आत आला आणि माझ्या शेजारी उभा राहिला. मी त्याच्याकडे पाहिले आणि पुन्हा माझ्या कामात व्यस्त झाले. माझा चहा बनवून झाला. मी त्याला चहा दिला आणि स्वतः ला पण घेतला.
" ये मृणू चिडलीस का माझ्यावर?", युसुफने हसत मला प्रश्न विचारला.
" मी कशाला चिडू. तू पैसे द्यायला आला आहेस ना फक्त मग पैसे दे चहा पिशिल आणि जाशील. यात चिडण्यासारख काय आहे?", मी मिश्कीलपणे त्याला उत्तर दिले.
" मी फक्त पैसे द्यायला आलेलो नाहीये.", त्याने पुन्हा खट्याळपने बोलत माझ्याकडे पाहिले.
" म्हणजे!" मी त्याला विचारले.
" थांब सांगतो." असे बोलत असताना त्याने स्वाठच्या हातचा कप खाली ठेवला. माझ्या हातातला कप सुद्धा त्याने माझ्या हातून घेऊन बाजूला ठेवला आणि एका झटक्यात त्याने मला त्याच्याकडे ओढली.
ESTÁS LEYENDO
आयुष्यामधले वळण.....
Fantasíaएका स्त्रीच्या आयुष्यात अनेक नवीन पुरुष डोकावत असतात. पण कोणत्याही बिकट परिस्थिती मध्ये तिला साथ देणारा हा तिचा जीवनसाथी तिचा नवराच असतो. त्यासंबंधी ही एक छोटीशी कथा.....