मी घरी आले. मुले सोबत होती आणि घरातली खूप कामे बाकी होती. मी सर्व कामे आटोपून घेतली. मुलांना जेवू घातले. मुलांना झोपविले. पण सर्व कामे करताना मला युसुफचे बोलणं सतत आठवत होते. तो असे अचानक बोलला त्याची उकल मला होत नव्हती. तसे बघायला गेलं तर सध्या त्याच बोलणं वागणं मला आवडत होत. त्याच्याशी भेटल्याने मला आनंद होत होता. पण सरळ गोष्ट प्रेमाची म्हटली तर तसा अजून मी विचार केला नव्हता. मी सर्व कामे झाल्यावर बेडवर पहुडली. सुरेश कामावरून आलेला असल्याने जेवण करून लवकर झोपी गेलेला. पण माझ्या विचारामुळे मला झोप काही येत नव्हती. मी या कुशीवरून त्या कुशीवर होत होते. सुरेश माझ्यावर खूप प्रेम करत होता मी सुद्धा त्याच्यावर खूप प्रेम करत होते. त्याचप्रकारे आमचे व्यवहारिक आयुष्य तसेच आमचे शरीर संबंध सुद्धा अत्यंत सुखकर होते. तसेच सुरेशचा स्वभवसुद्धा खूप छान होता. त्याच्यामध्ये उणीव काढावी अशी एकही गोष्ट नव्हती. पण युसुफ त्याहून वेगळा होता. त्याच वागणं पण खूप चांगल होत. त्यासोबत त्याच दिसणं आणि त्याचे राहणीमान सुद्धा खूप सुंदर होते आणि यामुळेच मी आपसूकच त्याच्याकडे आकर्षित होत होते. या सर्व विचारांमध्ये मी गढून गेले होते. तेवढ्या माझ्या मोबाईलवर मेसेज टोन वाजली. मी मोबाइल घेऊन पाहिलं तर युसुफचा मेसेज आलेला.
" हाय, मृणाल काय करते आहेस? झोपली आहेस का?", युसुफने मेसेज मध्ये विचारले होते.
" नाही. अजून जागी आहे." मी त्वरित उत्तर दिले.
" बरं, जेवलिस का?", युसुफने विचारले.
" हो जेवले. तू जेवलास का? आणि आता कुठे आहेस?", युसुफ जास्त वेळ घराच्या बाहेर असायचा तो लवकर घरी जात नसे त्यामुळे मी त्याला कायम ओरडायची.
" अग, मित्रांसोबत होतो घरी निघालो आहे.", त्याने सांगितले.
" लवकर जा घरी जास्त वेळ रात्रीच बाहेर थांबू नकोस", मी त्याला बजावले.
" हो हो, बाईसाहेब निघालो आहे. पण मला एक सांग माझ्या म्हणण्याचा तू विचार करणार होतीस तू केला का ?", त्याने तडक पुन्हा मला विचारले.
KAMU SEDANG MEMBACA
आयुष्यामधले वळण.....
Fantasiएका स्त्रीच्या आयुष्यात अनेक नवीन पुरुष डोकावत असतात. पण कोणत्याही बिकट परिस्थिती मध्ये तिला साथ देणारा हा तिचा जीवनसाथी तिचा नवराच असतो. त्यासंबंधी ही एक छोटीशी कथा.....