मी सकाळी झोपून उठले. घरातली सर्व कामे अवरली आणि बसले. मला राहून राहून रात्रीचा प्रसंग आठवत होते. त्यामुळे अजून त्या सहवासाची आठवण येऊन मन प्रफुल्लित होत होते. मी बसलेले तेवढ्यात मला युसुफचा मेसेज आला.
" हाय, काय करते आहेस?", युसुफने विचारले.
" काही नाही बसले आहे. तू काय करत आहेस?" ,मी त्याला रिप्लाय दिला.
" हा का, मी आता जॉब वर आहे.", त्याने सांगितले.
" हो का, मग साहेब गाडी चालवा माझ्यासोबत काय बोलताय." ,युसुफ बँक मध्ये कलेक्शन ऑफिसरचे काम करायचा. त्यामुळे तो सतत बाहेर फिरत असायचा.
" हो बाईसाहेब! पण काय करू रात्रीची आठवण येत आहे. कामावर मनच लागत नाहीये.", त्याने डोळा मारणारा ईमोजी पाठवून मेसेज केला.
" हो का, बर मला काम आहे नंतर बोलूया." ,मी त्याला थोड टाळण्याचा प्रयत्न केला.
" ये लगेच कुठे निघाली थांब जरा थोड बोलून मग जा.", त्याने विनवणी केली.
" बर बोल काय म्हणतोस?" ,मी त्याला रिप्लाय दिला.
" ऐक ना आज संध्याकाळी काय करते आहेस?" ,त्याने मला विचारले.
" काही नाही. नेहमी प्रमाणे मुलांना क्लासला सोडायला जाणार आहे आणि त्यानंतर घरी येणार." ,मी त्याला सांगितलं.
" ऐक आज मला भेटू वाटत आहे.", त्याने त्याची इच्छा व्यक्त केली.
" ये नाही हा आज नाही. मला घरी यायला लेट झाला तर माझे सासरे ओरडतात. त्यामुळे प्लिज आज नको ना." ,मी त्याला विनवणी केली.
" अग जास्त नाही फक्त एक तास भेटू ना.", त्याने सांगितले.
" एक तास कशाला? काय चालू आहे नक्की तुझ्या डोक्यात?" ,मी त्याला प्रश्नार्थक पणे विचारले.
" अग काही नाही नुसते बोलू भेटू बस." ,त्याने सांगितले.
मी त्यांना थोडा नकार दिला. पण मला त्याला जास्त वेळ टाळणे जमणार नव्हते हे मलाही माहिती होते. कारण त्याला भेटावे असे मलाही सारखे वाटत होते त्यामुळे मी त्याला होकार दिला पण फक्त एक तास भेटू या अटीवर मान्यता दिली. मला कळत नव्हते की मला काय होत आहे. पण मी त्याच्यावर प्रेम करत आहे हे मला जाणवत होते. मी दुपारचे जेवण केलं. थोडी रेस्ट घेतली आणि संध्याकाळी ६ वाजता मुलांना सोडायला बाहेर पडले. मुलांच्या क्लास पर्यंत जायला मला वीस ते पंचवीस मिनिटे लागायची. मी मुलांना क्लास मध्ये सोडले आणि युसुफला कॉल केला. त्याने मला एक ठिकाणी यायला सांगितले. जेंव्हा तो पत्ता पहिला तेंव्हा माझ्या लक्षात आले की हे ठिकाण माझ्या घरी जातानाच लागत आहे. त्यामुळे मला अजून बरे वाटले. मी तिकडे जायला निघाली. मला तिथेपर्यंत पोहचण्यास पाच सात मिनिटे लागली. मी तिथे पोहचले तर तिथे मला युसुफ उभारलेला दिसला. मी त्याच्याकडे गेले.
" हाय साहेब, आज इथे कुठे बोलवले?" , मी त्याला उत्सुकतेने विचारले.
" अग , दरवेळी भेटतो तिथेच सारखं जायचा कंटाळा आला त्यामुळे आज इथे बोलवले.", त्याने सांगितले.
" पण इथे बाग वैगेरे काहीच नाही आणि जवळ कॅफे सुद्धा नाही रे मग इथे कुठे बसायचं रस्त्यावर का?", मी त्याला विचारलं.
" अग तस नाही इथे आत मध्ये माझ्या मित्राची मोकळी रूम आहे. तिथे बसू.", त्याने मला हळूच सांगितले.
" अरे पण अस कसं? आणि आपलं फक्त भेटून बोलायचं ठरलेलं. मग आता हे काय? मला जाणवत आहे तुझ्या मनात काय आहे ते?", मी त्याला थोड तिरस्कार स्वरात म्हणाले. कारण मी तिथे पाहिलं तर समोर एक छोटंसं किराणा दुकान होते. त्या दुकांच्या साईड वरून आत जायला एक लहान बोळ होत. आणि दुकानाच्या मागे एक खोली होती. ते दुकान सुद्धा त्याच्यच मित्रच होत.
" अग तुला वाटतं तास काही नाही. मला फक्त बोलायचं आहे पण इथे उभारून बोलण्यापेक्षा आत बसून बोलू म्हणालो. तुला माझ्यावर इतका पण विश्वास नाहीये का?", तो थोडा रागाने आणि नाराजीच्या स्वरात मला बोलला.
" बरं बरं सॉरी, ठीक आहे बसू पण फक्त थोडा वेळच हा!", मला त्याला नाराज करणं आवडत नव्हत. मला त्याच्या मनात नक्की काय चाललं आहे हे समजत होते. पण त्याला नकार देण्याचं धाडस माझ्यामध्ये येत नव्हत. कारण तो नाराज झाला माझ्याशी बोलणं सोडलं तर मग मला त्याच्याशिवाय रहवणार नाही याची मला जास्त भीती होती. आणि तो माझ्यापासून दूर जाऊ नये असं मला वाटायचं. तो जाऊ नये म्हणून मी कोणतीही तडजोड करेल तयार होते.
त्याने त्याच्या मित्राकडून अगोदरच त्या रूम ची चावी घेऊन ठेवलेली. माझा होकार ऐकून त्याने ललागेच मला घेऊन त्या रूम कडे वाटचाल केली. आम्ही त्या रूम मध्ये आत गेलो. बाहेरून अजागळ वाटणारी ती रूम मात्र अरुण तशी नीटनेटकी होती. तिथे एक छोटासा सोफा होता त्यावर आम्ही दोघे बसलो. मी मुद्दामून थोड अंतर राखून बसली. युसुफ तिथे बसला. आम्ही थोड बोललो. पुन्हा युसुफने उठून फॅन लावला. मी त्याला म्हणाले अरे थोडी थंडी आहे तर फॅन नको लावू. तरीही त्याने फॅन चालूच ठेवला. नंतर तो सोफ्याजवळ आला आणि माझ्याकडे सरकून बसला. तो पुढे काय करेल याची खात्री आता मला वाटू लागली होती आणि त्याच विचाराने मी शहारली होती. तो पुढे काय करेल याची जाणीव असून मनात थोडी भीती वाटू लागली होती.
क्रमशः
STAI LEGGENDO
आयुष्यामधले वळण.....
Fantasyएका स्त्रीच्या आयुष्यात अनेक नवीन पुरुष डोकावत असतात. पण कोणत्याही बिकट परिस्थिती मध्ये तिला साथ देणारा हा तिचा जीवनसाथी तिचा नवराच असतो. त्यासंबंधी ही एक छोटीशी कथा.....