गुपीत

624 2 0
                                    


आपल्या आयुष्यात काही खास घडतच नाही, असं आपल्याला कधीकधी वाटतं. आणि मग असं खास काहीतरी आपल्याला मुद्दाम तयार करावंसं वाटतं. आपलं असं एखादं गुपित, जे फक्त आपल्यालाच ठाऊक असेल... एक असं गुपित, जे आपल्याला एक जगावेगळं अस्तित्त्व मिळवून देईल...

आणि चुकून कधी जर आपण जगापासून लपवत असलेलं गुपित जगासमोर उघडकीस आलं तर...? किंवा आपल्याला जे लपवावंसं वाटतंय त्यात फारसं जगावेगळं काहीच नाही, असं आपल्या लक्षात आलं तर...?

...चुकून असं कधी झालंच तर, सरळ नवीन गुपित बनवायचं. असं एखादं गुपित, जे आपली काहीतरी खास, वेगळी ओळख बनवेल - आपल्या स्वतःच्या नजरेत. आणि हे गुपित जितकं जास्त धोकादायक असेल, तितकं आपल्याला स्वतःबद्दल जास्तच खास वाटू लागेल...

ही गोष्ट आहे अशाच एका गुपिताची.

कांचन ही साधारण तिशीत पोहोचलेली तरुणी. दिसायला सुंदर, अगदी एखाद्या प्रोफेशनल मॉडेलसारखी. स्वावलंबी, स्वतःच्या पायावर उभी असलेली आणि स्वतःचे सर्व निर्णय स्वतःच घेणारी मुलगी.

एकोणीस-वीस वर्षांची असताना कांचनला वाटायचं की ती आजूबाजूच्या सभ्य जगातल्या सगळ्या मुली-बायकांपेक्षा वेगळी आहे. लैंगिक विचारांनी पिसाटलेलं वय होतं ते. आपल्याइतके 'घाणेरडे' विचार इतर कुठलीच मुलगी-बाई करु शकत नाही, असं तिला वाटायचं.

दोन-तीन वर्षांतच तिच्या लक्षात आलं की, लग्नाआधी आणि लग्नानंतर दुसऱ्या पुरुषांबद्दल विचार करणाऱ्या (आणि जमलं तर त्यांच्याशी संबंधसुद्धा ठेवणाऱ्या) खूप बायका-मुली आपल्या आजूबाजूला आहेत. तसंच, लग्न झालेल्या पुरुषासोबत झोपणारी ती जगातली एकमेव तरुण मुलगी नाही हेही तिला कळालं. पन्नाशीला पोहोचलेल्या पुरुषासोबत अफेअर करणाऱ्या आपल्यासारख्या इतरही पंचविशीतल्या तरुण मुली आहेत, हेसुद्धा तिला कळून चुकलं.

"पण कांचन, तुझं समीरवर मनापासून प्रेम होतं, फक्त अफेअर नव्हतं ते..." ती एखादा मंत्र म्हटल्यासारखं हे वाक्य स्वतःला सतत ऐकवायची. "समीर, तू त्या बाईमधे का अडकून पडलायस रे...? सुंदर मेकअपमागं दडलेल्या तिच्या चेहऱ्यावरचे धूर्त भाव तुला इतक्या वर्षांत कसे काय दिसले नाहीत रे...? तिचं तुझ्यावर नाही, तुझ्या पैशांवर प्रेम आहे... आणि तू तिच्यासाठी मला विसरायला तयार झालास... आपल्या दोघांच्या वयातलं अंतर विसरुन मी तुला आपलं सर्वस्व दिलं... पण तुझ्या बायकोचा दर्जा मात्र तू त्या कारस्थानी बाईलाच दिलास... इतका कसा निष्ठूर वागू शकतोस तू, समीर...?"

चरमसुख ( लघु प्रणय कथा) Donde viven las historias. Descúbrelo ahora