Ups! Gambar ini tidak mengikuti Pedoman Konten kami. Untuk melanjutkan publikasi, hapuslah gambar ini atau unggah gambar lain.
“काय रे, काय करतोयस?” “काही नाही गं, एक कथा लिहितोय.” “काय?? कथा? आणि तू? तू काय लेखक नाहीस कथा लिहायला!” “हं, बर्याच वाचकांनाही असंच वाटतं…” “काय?? वाचकांना? कुठले वाचक?” “अगं, ही एक वेबसाईट आहे, ज्यावर लेखक आपल्या कथा अपलोड करु शकतात. आणि या वेबसाईटवर येऊन कथा वाचणारे वाचक त्यावर प्रतिक्रिया नोंदवतात.” “कसल्या कथांची वेबसाईट आहे ही? आणि तू कसल्या कथा लिहितोस?” “अं… ही प्रणयकथांची वेबसाईट आहे… आणि मी अर्थातच प्रणयकथा लिहून पाठवतो…” “अच्छा, प्रणयकथा… म्हणजे सेक्स स्टोरीज म्हणायचंय तुला?” “नाही गं, नुसत्या सेक्स स्टोरीज नाही. मी स्त्री-पुरुषांचा प्रणय आणि त्याभोवतीच्या भावभावनांबद्दल लिहितो!” “काय??? तू आपल्या प्रणयाबद्दल लिहितोस? तुझं डोकं-बिकं फिरलंय की काय? तू आपल्या सेक्स लाईफबद्दल लोकांना सांगत फिरतोयस??” “आपल्या नाही गं, इतर लोकांच्या प्रणयाबद्दल लिहितो मी…” “इतर लोकांच्या प्रणयाबद्दल तुला कशी काय माहिती रे??” “अगं तसंच नाही काही. माझ्या माहितीतल्या लोकांची नावं आणि त्यांचं दिसणं-वागणं या गोष्टींच्या आधारानं लिहितो मी. पण बराचसा मजकूर काल्पनिकच असतो…” “पण हे असलं करायची गरजच काय? माझा नवरा अश्लील कथा लिहितोय या विचारानंच मला मळमळू लागलंय!” “अश्लील कथा नाही गं, प्रणय कथा! अगं या वेबसाईटवरच मी अशा कथा वाचायला लागलो. पण माझ्या कल्पनेतल्या प्रणयाचं वर्णन करणार्या कथा काही मला वाचायला मिळेनात. मग मी म्हटलं, आपणच का लिहू नयेत अशा कथा?” “म्हणजे अतिशयोक्ती आणि विक्षिप्त कल्पनांनी भरलेल्या कथा ना?” “नाही नाही, त्याच्या अगदी उलट! माझ्या कल्पना अगदी साध्या, सरळ आहेत. त्यामुळं मला अगदी साध्या, सरळ, खर्याखुर्या माणसांच्या कथा वाचाव्याशा वाटतात.” “बाप रे, तू आणि साधा-सरळ? पंधरा वर्षं झालीत आपल्या लग्नाला… आणि बाकीचं जाऊदे पण एवढी एक गोष्ट मला चांगलीच पटलीय की तू साधा-सरळ अजिबात नाहीस!” “जाऊ दे गं ते. सांगायची गोष्ट अशी की मी पाठवलेल्या सुरुवातीच्या कथा या वेबसाईटवरून रिजेक्ट झाल्या.” “बाप रे, तू लिहिलेल्या कथा अश्लिल वेबसाईटवर पण टाकायच्या लायकीच्या नव्हत्या?? देवा रे…काय लिहिलं होतंस असं?” “नाही गं, माझं शुद्धलेखन आणि वाक्यरचना त्यांच्या नियमांप्रमाणे नाही, असं म्हणाले” “असल्या कथा वाचून हातानं ‘गाळताना’ कसले आठवतात नियम आणि शुद्धलेखन??” “नाही गं, बरोबरच होतं त्यांचं. आणि वेबसाईटवरच ऐच्छिक संपादकांची यादी पण दिलीय त्यांनी. त्यातूनच मला काही जण मिळाले, माझं लेखन तपासून त्यात दुरुस्त्या सुचवणारे…” “काय?? आणि तू त्यांना या कामाचे पैसे दिलेस की काय?” “नाही गं, नव्या लेखकांना मदत म्हणून ते हे काम स्वेच्छेने करतात, फुकटात!” “हं, तुझ्या बाबतीत त्यांना फारच मदत करावी लागली असणार…” “हे बघ, तुझ्या खोलीत जा आणि तुझ्या लॅपटॉपवर माझी एखादी कथा वाचून ये. मग आपण पुढं चर्चा करू.”