शिवानी एका घशात घुसमटलेल्या किंकाळीनेच जागी झाली. तिची नाजूक पण वयात आलेली काया घामाने डबडबली होती. तिच्या मलमली आणि गौर कायेवरची ती काळी शिफॉन साडी आणि तंग बिनबाह्यांचा ब्लाउज जो तिच्या प्रमाणबद्ध स्तनांवर घट्ट बसला होता, तिच्या छातीच्या भात्याला काबूत ठेवायचा निष्फळ प्रयत्न करत होता. तीच काळीज जोरात धडधडत होतं. ती स्वतःला समजावत होती कि तिने जे थोड्या वेळापूर्वी अनुभवलं ते सर्व स्वप्न होत. पण आजची हि तिसरी रात्र आणि तेच स्वप्न. आता तिला झोप येणं अवघड होतं . म्हणून तिने मागच्या तीन महिन्यात घडलेल्या गोष्टींची उजळणी करायला सुरुवात केली.
तीन महिन्यांपूर्वी जेव्हा शिवानी गावात आली तेव्हापासून तिच्यात बराच बदल घडून आला होता. ती एक अल्लड २३ वर्षाची तरुणी म्हणून या गावात आली होती. पण असाइन्मेण्टचं ओझं आणि गावातील वातावरणाशी जुळवून घेता घेता तिच्या एका प्रकारचा सामंजसपणा आला होता. तिने प्राचीन आणि इतिहासपूर्व भारताचा अभ्यास केला होता आणि आता तिच्या डॉक्टरेटच्या प्रबंधासाठी तिला हा एक इंटरेस्टिंग विषय मिळाला होता. या गावाला तसं सांस्कृतिक महत्व काहीच नव्हतं. पण डोंगराने वेढलेलं निसर्गरम्य ठिकाण. दुर्गम जागेमुळे प्रगती आणि आधुनिकता तशी दूरच होती. नाही म्हणायला हा प्राचीन वाडा होता जो आता सरकारी बंगला होता. जिथे वीज, पाणी आणि आणि बाकी सोयी होत्या. तसं बघायला गेलं तर शिवानीला हा बंगला मिळायचं काहीच कारण नव्हतं पण तिचे मेंटॉर डॉक्टर गुप्ता यांच्या प्रयत्नामुळे हे सर्व शक्य झालं होतं.
शिवानीला हा प्रबंध लिहिण्यासाठी त्यांनीच गळ घातली होती. त्यांच्यामते इथल्या डोंगरातल्या गुहेत एक प्राचीन रहस्य लपलं होतं आणि त्या रहस्याची उकल करणाऱ्याला अद्भुत शक्ती प्राप्त होणार होती. गावात इंटरनेट ची सोय होणं शक्यच नव्हतं पण मोबाईलच्या तुटपुंज्या नेटवर्क मध्ये डॉ गुप्ता तिला ई-मेल द्वारे मार्गदर्शन करणार होते. या गावात येण्यापूर्वी शिवानी एक आधुनिक युवती म्हणतात तशी नसली तरी शहरी वातावरणात तयार झालेली मुलगी होती. तिच्यावर सौंदर्याची बनवणाऱ्याने विशेष उधळण केली होती. पाच फूट ७ इंच उंची. सडपातळ पण प्रमाणबद्ध बांधा. कंबर जरी बारीक असली तरी नितम्ब आणि उरोज मात्र व्यवस्थित भरले होते. मांड्या आणि पोटऱ्यापण शरीराच्या प्रमाणात. तीच गोष्ट दंड आणि मनगटांची.मेदाचा अतिरिक्त अंश अजिबात नाही. गोल चेहरा हरिणीसारखे काळेभोर रेखीव डोळे. चाफेकळी नाक, पातळ गुलाबी ओठ आणि नाजूक जिवणी आणि हनुवटी. आणि या सर्वाना परिपूर्ण करणारे लांबसडक काळेभोर रेशमी केस आणि अगदी गोरा नसला तरी उजळ रंग . इतकी सगळी सौंदर्याची संपत्ती असूनसुद्धा तिचे कधीच प्रेमसंबंध जुळले नव्हते. ती अरसिक होती अशातला भाग नाही पण दूर अभ्यासाच्या ठिकाणी तिने या सर्व मोहांपासून स्वतःला मुद्दामूनच लांब ठेवले होते. नाही म्हणायला प्रोफेसर गुप्तांच्या करड्या आणि पौरुषी व्यक्तिमत्त्वाकडे ती थोडी आकृष्ट झाली होती. प्रोफेसर गुप्ता एक मध्यवयीन व्यक्तिमत्व होते. त्यांनी अजून लग्न केलं नव्हतं. त्यांच्या मते ते आपल्या संशोधनात इतके गुरफटले होते के सांसारिक पाश त्यांना मानवणारे नव्हते. ते ऊंजेपुरे उजळ आणि कमावलेल्या शरीराचे होते. अर्धवट पिकलेले आणि क्रू कट केलेले केस त्यांच्या करारी चेहऱ्यात आणखीनच भर घालत असत.
YOU ARE READING
कस्तुरी कन्या
Paranormalनमस्कार रसिक मित्रानो. शृंगारिक कथांची आवड असलेल्यांसाठी हि एक नवीन कथा घेऊन येत आहे. हि कथा आधी दुसऱ्या एका प्लॅटफॉर्मवर प्रकाशित झाली होती. कथा शृंगारिक आणि भय या दोन्ही रसांनी सजवायचा मी प्रयत्न केला आहे. मला आशा आहे कि तुम्हाला हि कथा आवडेल. तुम...