कस्तुरी कन्या भाग ७:

120 3 0
                                    

शिवानीने गुप्तांचा मेसेज वाचला. आता त्यात करण्यासारखे काही नव्हते. ते तिचे मेंटॉर होते आणि तिला तातडीने निघणे भाग होते. तिने ३-४ दिवस पुरतील इतके कपडे आणि तिचा लॅपटॉप बरोबर घेतला. सकाळची आन्हिक आवरली. तिला २-३ दिवस थोडा थकवा जाणवत होता मात्र त्याचे कारण फक्त गुप्ता, सोपान आणि सोनाली यांनाच ठाऊक असणार होते. तिने सोनालीला आपल्या शहरातल्या व्हिजिटबद्दल सांगितले आणि आज पहिल्यांदाच सोनालीच्या चेहऱ्यावर उमटलेली चिंतेची लहर शिवानीला जाणवली. शिवानीने कारण विचारताच सोनाली सारवासारव करत म्हणाली "तसं काही विशेष नाही. तुझी सवय झाली होती. आणि नाही म्हटलं तरी सोपान माझा भाऊ आहे आणि तो पण दोन दिवस कुठे गेला आहे काय माहित. असो. तुला जाणं गरजेचं असेल तर जा आणि काळजी घे. मी वाट बघते आहे तुझी." शिवानीने सोनालीची समजूत काढत म्हटलं "वेडा बाई.. २-४ दिवसांचाच तर प्रश्न आहे. आणि मला पण आता सवय झाली आहे ना तुझी." दोघीही या वाक्यावर हसल्या.

दुपारपर्यंत गुप्तांचा ड्राइवर वाड्यावर पोहोचला होता. दुपारची जेवणं उरकून शिवानी निघाली. आज सुमारे ४ महिन्यानंतर ती या गावाच्या बाहेर पडत होती. तिने परत एकदा या काळाचा आढावा घ्यायला सुरुवात केली. रहस्यमय गुंफाना तिची पहिली भेट, अमावसचं दर्शन, स्वप्नांची मालिका, तिचे सोनाली आणि सोपानबरोबर जुळलेले आणि बिघडलेले संबंध, गुप्तांबरोबरची ती रात्र. शिवानी हळूहळू झोपेच्या अधीन झाली. गाडी आता गावाबाहेरच्या जंगलातून पुढे हमरस्त्याला लागली आणि शहराच्या दिशेने मार्गस्थ झाली.

इथे सोनालीच्या संतापाला सीमा राहिली नव्हती. कालपर्यंत ती या नाट्यात गोवल्या गेलेल्या सर्व पात्रांना आपल्या इशाऱ्याप्रमाणे नाचवत होती. पण आता सर्वच फासे उलटे पडले होते. तिची हद्द गावाबाहेरच्या जंगलाच्या सीमेपर्यंतच होती आणि आता तिचा शिवानीवर अंमल चालणार नव्हता. जर शहरात जाऊन काहीही कारणाने शिवानीचा गावात परतण्याचा बेत बदलला असता तर अनर्थ झाला असता. सोपान उर्फ अमावस.. त्याचीही तीच गत होती. आणि आता तो हि नाहीसा झाला होता. जर शिवानी चतुर्दशीपर्यंत परत अली नसती तर, ती अघोरी साधना चानीवर उलटून तीच बळी जाणार होती. काही करून शिवानीने परत येणे आवश्यक होते. सोनाली आज पहिल्यांदा स्वतःला असहाय समजत होती.

कस्तुरी कन्याWhere stories live. Discover now