शिवानी पोर्चमध्ये तयार होऊन वाट बघत होती. तिने सैलसर पोनीटेल बांधला होता आणि स्किन फिट ब्लु जीन्स आणि व्हाईट टी शर्ट घातला होता. तिला प्रोफेसर जिन्यातून खाली येताना दिसले. त्यांनी ब्लॅक पुलओव्हर आणि ब्लू जीन्स घातली होती. दोघांनीही व्हाईट स्पोर्ट्स शूज घातले होते. शिवानी प्रोफेसरना बघून म्हणाली "आय मस्ट से. यु आर लूकिंग टेन इयर्स यंगर दॅन एव्हरीडे" शिवानी आणि गुप्तांनी तो दिवस सर्व काही विसरून एन्जॉय केला. संध्याकाळी ते एका शांत टेरेस रेस्टोरंटमध्ये गेले. एक कोपऱ्यातील टेबल पकडून त्यांनी आता निवांत बोलायला सुरुवात केली. शिवानीला प्रोफेसर म्हणाले "शिवानी घटना इतक्या वेगाने घडत होत्या कि मला काही समजायला वेळच मिळाला नाही. पण मला तुला सांगायचंय कि मी जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मी तुझ्याकडे आकृष्ट झालो होतो. वयाच्या अंतरामुळे म्हणा, माझ्या प्राध्यापकी इमेजमुळे म्हणा किंवा माझा बुजरेपणा म्हणा, मी तुला सांगू शकलो नाही, पण मला तुला आता सांगावेच लागेल. तू मला खूप आवडतेस. तुझ्याआधी मला कोणत्याही स्त्री बद्दल असं वाटलं नव्हतं. मला तुझ्याबरोबर माझं सर्व आयुष्य काढायला आवडेल. पण एक स्पष्ट सांगतो लग्न हि संस्था मला बिलकुल मान्य नाही. हे सर्व फॉर्मॅलिटीसारखं आहे. आणि मला कुठल्याही बंधनात अडकायला आवडत नाही." प्रोफेसर आता शिवानीकडून उत्तराची अपेक्षा करत होते. शिवानीने पण लग्नाचा विचार केला नव्हता पण तिला प्रोफेसर आता आवडू लागले होते. तिने फार वेळ न दवडता होकार दिला आणि दोघेही नव्या नात्याची सुरुवात सेलेब्रेट करू लागले. प्रोफेसर म्हणाले "शिवानी, आपल्याला संशोधनाकडे दुर्लक्ष्य करून चालणार नाही. मला माहित आहे आजच्या रात्रीसाठी तुझ्या मनात काही कल्पना आहेत पण मी म्हणेन कि आपण ते उद्या सकाळची राखून ठेवलं तर? लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन असाइनमेंट टुनाईट." शिवानीने थोड्याश्या निराशेने होकारार्थी मान हलवली. पण प्रोफेसरांनी तिला निराश होउ दिले नाही. जेवण संपवून ते घरी जायला निघाले तेव्हा प्रोफेसर म्हणाले. "शिवानी, आय वॉन्टेड टू हॅव थिंग्स परफेक्ट. मी काही अरेंजमेंट्स केल्या आहेत. या कॉम्प्लेक्समध्येच माझ्या मित्राच ब्युटी पार्लर आहे. आपण तिथे जाऊ या. शिवानी आणि प्रोफेसर पार्लरमध्ये शिरले. ते एक उच्चभ्रू युनिसेक्स पार्लर होते. प्रोफेसरनी आधीच शिवानीसाठी डिटेल्ड ब्रायडल मेकओव्हर अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती.
ESTÁS LEYENDO
कस्तुरी कन्या
Paranormalनमस्कार रसिक मित्रानो. शृंगारिक कथांची आवड असलेल्यांसाठी हि एक नवीन कथा घेऊन येत आहे. हि कथा आधी दुसऱ्या एका प्लॅटफॉर्मवर प्रकाशित झाली होती. कथा शृंगारिक आणि भय या दोन्ही रसांनी सजवायचा मी प्रयत्न केला आहे. मला आशा आहे कि तुम्हाला हि कथा आवडेल. तुम...