कस्तुरी कन्या भाग ६:

278 4 1
                                    

चतुर्थीची उत्तररात्र चालू झाली होती आणि आभाळ स्वच्छ असल्यामुळे पिठूर चांदणे पडले होते. गुप्तांनी निघण्यापूर्वी बाल्कनीत पहिले. सोपान तिथे नव्हता. गुप्ता वाड्याबाहेर आले आणि जंगलाची वाट चालू लागले. गुप्ता मिट्ट काळोखातून अंदाज घेत घेत त्या गुंफेजवळ आले. दाट जंगलाच्या पार्श्वभूमीवर ती गुंफा एखाद्या आ वासून स्तब्धपणे आपल्या शिकारीची वाट पाहणाऱ्या हिंस्त्र श्वापदाप्रमाणे दिसत होती. गुप्तांनी एक दीर्घ श्वास घेतला. ते आपल्या सर्वोच्च लक्ष्याच्या आता खूपच जवळ होते. आपल्या जवळच्या सॅकमधून त्यांनी एक टॉर्च बाहेर काढला आणि सॅकमधल्या वस्तूंचा आढावा घेतला. सर्व आवश्यक वस्तू त्यांनी बरोबर आणल्या होत्या. आता टॉर्चचे तोंड त्यांनी गुंफेकडे वळवले आणि ते आत जाऊ लागले. सुरुवातीचा वळणदार मार्ग संपल्यावर त्यांनी गुंफेच्या शेवटी असणाऱ्या एका शिलाखंडाकडे आपल्या टॉर्चचा झोत टाकला. गुंफेतले बाकीचे शिलालेख आठवून त्यांच्या चेहऱ्यावर एक मिस्कील स्मित तरळले. एखाद्या नवख्या संशोधकाला त्याच्या संशोधनाच्या मूळ मार्गावरून दूर नेण्यासाठी त्या शिलालेखाचा उपयोग झाला असता आणि शिवानीच्या बाबतीत ते झाले हि होते पण अजाणतेपणी तिने त्या शिलाखंडाचा फोटो काढला होता आणि गुप्तानां त्या आजपर्यंतच्या अज्ञात राहिलेल्या रहस्याच प्रवेशद्वार सापडलं होत. गुप्तांनी गुहेची ती शिळा टॉर्चच्या प्रकाशात व्यवस्थित न्याहाळली आणि ती कपार शोधली. त्यांना वाटत होते कदाचित ती कपार काही करून मोठी झाली तर पुढचा रास्ता सापडेल. त्यांनी त्या कपारीच्या आसपास शोधण्यास सुरुवात केली. त्यांना हे हि नक्की माहित नव्हते कि ते काय शोधत होते पण लवकरच त्यांची निराशा झाली. तिथे संशोधनाला दिशा देईल असे काहीच नव्हते.

आजची रात्र फुकट गेली असे वाटून निराश मनाने गुप्ता गुहेतून बाहेर पडले आणि त्यांनी गुंफेच्या तोंडावरच भिंतीतुन बाहेर आलेल्या दगडी कांबेचा आधार घेत आपल्या शरीराचा भार त्यावर टाकला आणि... अचानक कर्रर्र.. र्रर्र असा आवाज चालू झाला गुप्तांनी चमकून गुंफेच्या आतल्या दिशेने टॉर्च वळवला आणि ते थिजून जगाच्या जागी उभे राहिले.

कस्तुरी कन्याDove le storie prendono vita. Scoprilo ora