अपूर्वाच्या नाकातल्या नथनीला आज काय झालं होतं तिला कळेनाच. मघापासून ती अकोडा लावायचा प्रयत्न करत होती पण तो काही केल्या फसत नव्हता. नऊवारीच्या वजनाने आणि त्याच्या नवेपणाने ती तशीही घामाझोकळ झाली होती. त्या घामाने तिच्या फॉउंडेशन आणि आय शॅडो तिला वारंवार पॅच अप करावं लागत होतं. तिने कसतरी तो नथनीचा अकोडा लावला आणि पायात चप्पल सरकवली आणि ती दारात आली. सर्वीकडे एक नजर टाकली . गॅस , हो केलाय बंद , लाईट फॅन , सर्व बंद केलंय. तिने स्वतःला कन्फर्मशन दिलं आणि चाबी घेऊन बाहेर पडली. दार व्यवस्थित बंद केलं लिफ्ट मध्ये शिरली. आरशात बघितल आणि एक स्वतःला चाचपून तिने स्माईल दिलं.
चाळिशीतली अपूर्वा उंच सडपातळ, कंच हिरव्या कलरची नववारी पैठणी अपूर्वाला साजेशी दिसत होती त्यावर तिने केसांचा जुडा घातला होता त्यावर नेट लावून त्याला आकारबद्ध केलं होतं. जूड्यावर मोगऱ्याचा गजरा पेरला होता . गळ्यात एकसरी मंगळसूत्र त्यावर भरजरीत चापलाकंठी, मॅजेन्टा बॅकलेस ब्लॉऊज .. सपाट पोटावरच्या गोल मोठ्या खोलगट नाभिवरील नक्षीदार कंबरपट्टा , मऊशार बाहूंवरचा कातीव मोरपिशी बाजूबंद .. हातात हिरव्या बांगडया .. बोटात मोराच्या आकाराची अंगठी कानात टॉप्स आणि नाकात लयदार नथ .. जर कुणी बघितलं तर बघतच राहावं असं तिचा वेलांटीदार शरीर .. नाजूक, कातीव पण थोडे जाड डाळिंबी ओठ. खांद्यावर एक हलकासा तीळ.भाचीच्या लग्नात जाताना तिने संपूर्ण प्रयत्न केला होता कि ती सर्वांपेक्षा वेगळी दिसेल. ती कार मध्ये बसली आणि कार चालू लागली. त्या.वेगवान कारच्या कितीतरी पटीने अपूर्वा च्या विचारांचा वेग होता. तीच्या लग्नात सुद्धा ती अशीच तयार झाली होती.
YOU ARE READING
ऑनलाईन
Fantasyऑनलाईन येवून एकमेकांवर मनसोक्त प्रेम करता येतं. कुणाला मस्त गरमागरम बोलायच असेल तर या ऑनलाईन