शब्द

165 0 0
                                    

मी तसाही कोण आहे कोण नाही
पाखरांचा का ठिकाणा होत नाही?

मी जगाचा होत गेलो होत आहे..
का कुणीही आज माझा होत नाही?

ते सुखाचा घेत होते शोध सारे !!!
मी तसाही रोज माझा होत नाही

मी हवेशी बोलतो हे फार झाले
मी कुणाचा का कधीही होत नाही?

"शब्द" होतो शब्द आहे मीच माझा
बोललो तर कोण वेडा होत नाही

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Sep 02 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

ऑनलाईन Where stories live. Discover now