chapter 19

82 3 6
                                        

आयुश्री रेड नाइटी घालून झोपायला गेली खूप वेळ झाला तरी तिला झोप येत न्हवती ह्या कुशी वरून त्या कुशी वर फिरत होती शेवटी वैतागून ती उठली आणि गॅलरी मधे जाऊन थोडा वेळ बसली... बाहेरची शांतता, आभाळात चांदन्याचा पडलेला सडा त्यात तो थंडगार वारा तीच्या अंगाला शहारा देऊन जात होता ती पाय जवळ घेऊन बसलेली.

थोडा वेळ झाला तिने टाइम बघितला तर रात्रीचे 12.30 वाजले होते तिने दाराकडे बघितल आणि मनातच बोलली "आयुश्री एवढ्या दिवस नाही आला तर आज कसली अपेक्षा करतेस" अस बोलुन ती रूम मध्ये आली आणि झोपायला जाणार तेवढ्यात दार उघडल्याचा आवाज आला आयुश्रीने माघे वळून बघितलं तर अभिराज आला होता आयुश्री त्याचा कडे बघतच राहिली.

त्याची केस विसकटलेली, शर्टचे वरचे तीन बटण उघडलेले, त्याचा ब्लेझर त्याच्या डाव्या हातात होता त्याला बघून आयुश्रीला काय तरी होत होत... पण अभिराजची चाल थोडी बदललेली तो अडखळत सावरत चालत होता पण का ?.

अभिराजला अस चालताना बघून आयुश्री लगेच त्याच्या जवळ गेली आणि त्याचा हात तिच्या खांद्यावर घेत त्याला बोलली "काय झालं तुम्हाला ? बरे आहात ना तुम्ही ?" अभिराजला ती काय बोलते काहीच समजत न्हवत.

Abhiraj's pov. (pov म्हणजे पॉईंट ऑफ व्हिव)

मी जेव्हा दार उघडला तेव्हा आयुश्री चादर नीट करत होती, आज ती रोज पेक्षा खूप वेगळी दिसत होती मी तिला पहिल्यांदा असं म्हणजे शॉर्ट ड्रेस आय मिन नाईटी मधे बघितलं, तिने केसानचा लुज आंबाडा बांधलेला तिचे पाय दूधा सारखे पांढरे होते तिची ती नाईटी मांड्यांचा खूप वर पर्यंत होती म्हणजे जर ती थोड अजून खाली वाकली असती तर.... "अभि काय होतंय तूला काय बोलतोयस तू" मी स्वताला सावरत पुढे आलाे तेवढ्यात आयुश्रीने पुढे येऊन माझा हात तीच्या खांद्यावर टाकला आणि काय तरी बोलत होती खर तर मी तीच्या सौंदर्या मधे एवढा बूडुन गेलेलो की मला ती काय बोलते हे कळत न्हवत.

..............................

आयुश्री अभिराजचा खूप जवळ होती. तिने अभिराजला बेड वर बसलं आणि पाणी दिल अभिराज ह्या सगळ्यात फक्त तिच निरीक्षण करत होता तिच्या लक्षात पण न्हवतं कि तिने नाइटी घातले आणि त्या नाइटीची स्लीव खळी आले.

फक्त माझी ❤ Where stories live. Discover now