क्लेश - Part 1

9.7K 19 2
                                    

"तुला मी ह्या आधी सांगितले होते कि नाही बोल? लाज नाही वाटत का पुन्हा पुन्हा तेच करायला. अरे किती खोटारडा आणि निर्लज्ज माणूस आहेस तू. शी. मला खरेच पश्चाताप होतोय तुझ्याशी लग्न केल्याचा."

... . . .... .

"कितीवेळा तुझ्या चुका अशाच सोडून द्यायच्या मी. चुका तरी कशा म्हणू. जाणूनबुजून केलेल्या गोष्टींना चुका नाही गुन्हा म्हणतात.. "
.....

"शट अप.."

... ...

"ह्यावेळी काहीच ऐकून घेणार नाहिये मी तुझं ."

....

"खूप खोटारडा आहेस रे तू खूपच.."

.....

मी येणार नाहीये.. मी आता माझ्या आजीकडे जाणार आहे. मला वाटेल तेव्हा मी येईन...
....

नको. तू अजिबात यायचे नाहीयेस इकडे .. तुला मी आत्ताच वॉर्न करते.
... ...

"माझं मी बघून घेईन काय करायचंय.. तू आणि ती बाई .. जस्ट गो टू हेल."

आसावरी खूप तापली होती.. रागाने तिच्या अंगाची लाही लाही झाली होती. तीने फोन स्वीच आॅफ केला.

****

सौरभ आणि असावरीचे १ वर्षापूर्वी लग्न झाले होते. लग्नाआधी ते ६ महिने एंगेज होते. ते दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. मॅट्रिमोनी साईट मधून त्यांचे लग्न जुळले पण एकमेकांना पाहता क्षणीच ते स्वतःला हरवून बसले. असावरी दिसायला अतिशय सुंदर होती. तिचे व्यक्तिमत्व अतिशय कॉन्फिडन्ट होते. सौरभही दिसायला हॅंडसम होता. महत्वाची गोष्ट म्हणजे योगायोगाने दोघे एकाच कंपनीसाठी काम करत होते.

पण एकमेकांना कधी कंपनी कॅम्पस मध्ये पहिले नव्हते त्यांनी. बस तर मग लग्न ठरले. लग्न ६ महिन्यांनी होते म्हणून दोघांचे फिरणे वैगरे होऊ लागले. साहजिकच ते एकमेकांशी शारीरिक रित्या इन्टिमेटही होत होते. लग्नानंतर मॉरेशिअसला हनिमून केला. आसावरी दिसायला क्युट फेसिंगची असली तरी शरीराने भलतीच मादक होती. साडेपाच फूट उंच असावरीची फिगरही उंचीला साजेशीच होती. हनिमूनला तिला पुरुषांच्या नजरा तिला कशा स्कॅन करत होत्या हे तिला चांगलेच माहित होते. पण ती सौरभमध्ये डुंबून गेली होती. सौरभही तिला हर तर्हेने रिझवत होता. तिला सेक्स मध्ये सॅटिस्फाय करताना त्याचा चांगलाच कस लागत होता.

क्लेशOnde histórias criam vida. Descubra agora