गोव्याच्या ग्रँड हयात मध्ये सौरभच्या कंपनीने जोरात पार्टी ऑर्गनाईझ केली होती. कॉकटेल पार्टी सोबतच स्वामिन्गपूल वैगरे सर्वच गोष्टी असल्याने पार्टीची रंगात अतिशय बोल्ड झाली होती. सर्वच जण मोकळेपणाने वावरत होते. सौरभ आणि त्याचा मित्र पराग २ तासांपूर्वीच तिथे पोहोचले होते. रूमवर जाऊन फ्रेश वैगरे होत पूल पार्टीचा अटायर त्याने चढवला. ७ वाजता पार्टी सुरु झाली. एक एक करत सगळे जॉईन होत होते. सौरभ मित्रांमध्ये मश्गुल होता.
१-२ लाईट पेग झाले होते. त्याचा मूड खूप छान होता. एकमेकांची नीटपणे मारत पाणचट जोक करत इतरवेळी सभ्य एम्प्लॉईजचा मुखवटा चढवलेले लोक आज मात्र सगळे सभ्यतेचे निकष घरीच सोडून आले होते.
सौरभ आणि त्याचा ग्रुप यांची मैफील जमली होती. तेवढ्यात मागून माया आली. सौरभला तिने मागूनच पहिले आणि बिनधास्तपणे मोर्चा त्याच्याकडे वळवला.
"हाय सौरभ." सौरभच्या खांद्यावर हात ठेवत माया बोलली.
सौरभने मागे वळून पहिले. मायाला पाहून तो उठला आणि बाकीच्यांना म्हणाला,"आय आम रेलोडींग. कोणाला काही हवे आहे का मी चाललोय."
पराग म्हणाला,"त्या वेटरला काहीतरी म्हणावं चकणा आणून ओत इथे."
"ओके." असे म्हणून सौरभ निघाला.
मायाला त्याचे तसे दुर्लक्ष करणे अपेक्षित होते. पण तिला कळले कि सगळ्यांसमोर आपणच असे करायला नव्हते हवे. वेळ चुकली. आपला अपमानही झाला. तेवढ्यात पराग तिला म्हणाला," ओ माया मेमसाब. इकडे आम्ही पण आहोत. आम्हाला हाय बाय करायला जीभ टाळूला चिकटते का?"
माया डोळे फिरवत तिथून निघून निघाली.
सौरभ वेटरला इंस्ट्रक्ट करून बार कॉउंटरवर गेला. स्वतःसाठी ड्रिंक बनवून घेत असतानाच साईडने मायाचा आवाज आला,"वन लार्ज मॅजिक मोमेन्ट ऑन द रॉक्स."
सौरभने नजर फिरवली.
"सौरभ. ओळख सुद्धा देणार नाहीयेस का रे?" माया म्हणाली.