त्या गोष्टीला आता ४-५ महिने होऊन गेले होते. परत एकदा असावरी आणि सौरभ लव्ह बर्ड्स सारखे एकमेकांमध्ये घट्ट गुंतून गेले. त्या घटनेचा विसर दोघांना पडला नव्हता पण त्याचा कोणीही विचार करत नव्हते. सध्या तरी माया सौरभच्या टीम मध्ये नव्हती त्यामुळे त्याचे कामही मस्त चालले होते. कधी दिसलीच तर हा नजर फिरवत असे. किंवा जवळपास असेल तर हा दुसरीकडे जात असे. सौरभच्या डिपार्टमेन्टची अन्युअल मीटिंग ठरली होती. ती होती गोव्याला. त्यात रिवॉर्डस अँड रेकग्निशन्स सुद्धा होणार होते. सगळे डिपार्टमेंट गोव्याला जाणार होते. असावरीचे डिपार्टमेंट वेगळे होते. शिवाय तिला तिची टार्गेट्स कम्प्लिट करायची होती. ती काही जाणार नव्हती.
जायच्या आदल्या दिवशी सौरभला पॅकिंग मध्ये मदत करत असताना ती थोडी शांत होती.
सौरभला जाणवले. तो तिला म्हणाला," स्वीट्स काय झालंय? मी लढायला चाललो असल्यासारखी दुखी झालीयेस कि काय?"
असावरी मानेनेच नाहीं म्हणाली.
सौरभने तिला मागून पकडले आणि मानेवर किस करत म्हणाला,"मग जिथं पर्यंत मला माहीत आहे, माझा २ दिवसांचा विरह सहन न होण्याइतकी अमॅच्युअर नाहीयेस तू."
असावरी शांतच होती.
तिला वळवत तिच्या कमरेत हात घालत तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला," काय? बोल ना? तुझ्या डोळ्यांना विचारले तर ते वेगळे सांगत आहेत. तू नीट काही सांगत नाहीयेस. काय चाललंय?"
असावरीला मनात ठेवणे कठीण झाले. तिला वाटले करूयात मोकळे मनात आहे ते. उगाच माझ्या मनाला टोचणी नको कि काहीच सांगितले नाहीं.
"सौरभ. तूझे सगळे कलिग्स येत आहेत ना मीटिंग आणि पार्टीला?" असावरी म्हणाली.
"हो. व्हाय? ओके.. समजलो. असावरी. तुला जी भीती किंवा शंका वाटत आहे तसे काहीही घडणार नाही. आय विल बी मोर अलर्ट धिस टाइम."आणि तिथे माझे सगळेच कलिग्स असणार आहेत. सो डोन्ट वरी मला खूप प्रोटेक्शन आहे तिकडे." असे म्हणून तो हसू लागला.