फ्रेंड्स विथ बेनेफिटस् CHAPTER 1

11.5K 21 1
                                    

Chapter 1

"मिसेस सरपोतदार..माधवी मॅडमनी तुम्हाला आत बोलवलय हातात फोन चा रिसिव्हर पकडत 'सिद्धी नर्सिंग होम'ची रिसेपनिस्ट म्हणाली.

केतकी ला क्लिनिक मध्ये येऊन अवघे पाच ही मिनिट झाले नव्हते. पण आमदाराच्या सुने ला वाट पाहायला लावण्याचा आगाऊपणा डॉक्टर करणार नव्हती. तिच्या क्लिनिकच्या अनधिकृत मजल्याचे काम दादासाहेबांच्याच वशिल्याने पास झाले होते. दादासाहेब सरपोतदारांचा शहरात तसा मोठा दबदबा होता. पक्ष सत्तेत आल्यास कमीतकमी राज्य मंत्र्याचे तिकीट तरी त्यांना पक्के होते. रेसिपनीस्टचा आवाज कानावर पडताच केतकी ने हातातले मासिक टेबलावर ठेवले आणि केबिनकडे वळली. दारावर डॉ. माधवी दवे (गायनॉलॉजिस्ट एम.डी.जी.ओ) अशी पाटी लावली होती.

"आत येऊ मॅडम" ...केतकी ने दरवाजा अर्धवट ढकलत विचारलं. केबिन व्यवस्थित प्रशस्त होती. दरवाज्या समोरच टेबलामागे चाळीशीतल्या डॉक्टर माधवी बसल्या होत्या.

"या.. या ..मिसेस.सरपोतदार ..बसा .....असे म्हणत डॉक्टर ने आपल्या टेबलाच्या ड्रॉवर मधून एका एनवलेप मधुंन पेपर काढुन त्यांनी डोळ्यावर चष्मा लावला. केतकी आत येत समोरच्या खुर्ची वर बसली.

"तुमच्या सर्व टेस्ट तर नॉर्मल आल्यात. रिपोर्ट मध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम दिसत नाही...डॉक्टर पेपर वर नजर टाकत केतकी ला म्हणाल्या.

"डॉक्टर ..जर रिपोर्ट सर्व नॉर्मल असतील.नक्की प्राब्लेम काय आहे.? लग्नाच्या चार वर्षात मी एकदाही प्रेग्नेंट नाही राहिली ओ....केतकी अगदी कळवळून बोलत होती.

"हम्म ..इट्स डिपेंडस..काही वेळा सेक्स पॉजीशन चुकीची असु शकते. काही पुरुषाचे स्पर्म लो असु शकतात. काही वेळा स्पर्म अंडाशयकडे जाईपर्यंत कमजोर पडु शकतात. म्हणूनच मी मागच्या व्हिजीटलाच तुम्हाला सांगितले होते..तुमच्या मिस्टराना घेऊन या..त्यांच्या टेस्ट केल्या तर च आपल्याला कळू शकते खरं कारण काय आहे ते..........डॉक्टरानी अगदी स्पष्ट करून केतकी ला सांगितले.

फ्रेंड्स विथ बेनेफिटस्Where stories live. Discover now