फ्रेंड्स विथ बेनिफिटस् CHAPTER- 6

5.4K 7 1
                                    

नेहाला भेटून आठवडा उलटून गेला होता. हे अगदीच अती झालं होत.आपला वापर केला जातोय आता असे तिला वाटायला लागले होते. तिच्या बद्दल मनात राग नसला तरीही तिला वाईट वाटले होते. आता आई होण्यासाठी असा उपाय अवलंबायचा ?? पण नेहा हे सहज बोलून गेली होती. आपल्या मैत्रिणीने आपल्या नवऱ्याबरोबर समागम करावा असे जगातील कुठल्याही स्त्री च्या मनात ही येणार नाही. नेहा कधीच समाजाच्या चोकटीत राहिलेली मुलगी नव्हती. तिच्या मनाला पटेल तसेच वागायची. तिने नेहमीच केतकी च्या भल्यासाठी विचार करायची. आपण जास्तच जरा ओव्हररिऍक्ट झालो असे तिला आता वाटायला लागले. जयदेव ने जर तिला जरा समजुन घेतले असते ती आज ह्या पेचप्रसंगात सापडली नसती. आजही ती जयदेव मित्रांबरोबर पार्टी ला बाहेर गेला होता. त्याची वाट बघता बघता तिचे डोळे कधी मिटले तिला कळलेच नाही.

जयदेवने हळूच बेडरूम चा दरवाजा उघडला. दबक्या पावलानी बेडरूम मध्ये येत त्याने सर्वत्र नजर फिरवली. रूम चा लाईट चालु च होता. केतकी गाढ झोपली होती. . तिच्या दुलइतुन तिचा एक पाय बाहेर डोकावत होता. तिच्या पायातले पैंजण तिच्या गोऱ्या रंगाला मोहक दिसत होते. तिची सुंदर शेप दिलेली लाल रंगाची चुटुक रंगलेली नखें त्याला मोहात पाडत होती. नशेमुळे त्याच्या शरीराचे झोके जात होते. तो तिच्या जवळ जाऊन बेडवर बसला त्याने तिच्या केसावरून हात फिरवला. तिला स्पर्श जाणवला. तिने डोळे किलकिले केले.जयदेव ने आपला हात तिच्या गालाला लावला. तशी चटकन उठली.

"काय करतोयस " त्याचा हात झटकत ती म्हणाली.

"अरे अशी दचकतेस का ?...गालाला हात लावला फक्त. जयदेव ला तिच अस झटकन आवडल नव्हत.

"अरे हात खुप गार आहेत म्हंणून म्हटलं. केतकी आता शांत पणे म्हणाली.आपण अस रिऍक्ट व्हायला नको होत तिच तिला कळलं. त्याने तिला गच्च मिठी मारली. तिच्या गालावर, मानेवर ,ओठावर आपले ओठ फिरवू लागला.

केतकी ला ते सर्व नकोस वाटत होत. त्याच्या तोंडातुन व्हिस्कीचा दर्प वास येत होता. तिचा विरोध त्याला जाणवत होता. तरीही तिच्या अंगाला चिकटत होता. केतकीने त्याला मागे करायचा प्रयत्न केला. पण जयदेव ने पकड घट्ट केली. तिने सोडवायचा प्रयत्न केला. जयदेव ने पकड सोडली पण तिचा हात धरून जवळ ओढले.

फ्रेंड्स विथ बेनेफिटस्Where stories live. Discover now