"केतकी ..मिट माय हजबंड, मंदार ..आणि मंदार तुला ..मी बोलले होते ना माझी कॉलेज ची मैत्रीण ..केतकी हीच ती ..नेहा ने केतकीला त्याची ओळख करुन दिली.
"आ…मम्म…काय ?? केतकी ची वाचाच बसली.
हा नेहाचा नवरा आहे ...मुळात नेहाच लग्न झालंय ..आणि तिला गोंडस बाळ सुद्धा आहे..केतकी ला आता भोवळ यायची बाकी होती. आपला नवरा आणि मुलगा सोबत असताना ही बय्या आपल्या बरोबर ट्रायल रूम मध्ये….हे देवा ह्या पोरी च नक्की काय ते सांगता येत नाही . नेहा ने केतकी ला मोठा धक्का दिला होता.
नेहाला ला त्यावेळेस केतकी ने घाईगडबडीत घेतलेला लग्नाचा निर्णय अजिबात रुचला नव्हता.म्हंणुन ती तिच्या लग्नाला ही हजर राहिली नाही. मुळात एखाद्या अनोळखी मुलाबरोबर स्वभाव न जाणता आपले पुर्ण आयुष्य तरी कसे घालवायचे. हा एक केवळ मूर्खपणा आहे. नेहा ने त्यावेळेस तिला खुप समजवायचा प्रयत्न केला. पण आईवडलांच्या दबावाला बळी पडत केतकी ने लग्नाला होकार दिला. चार वर्ष त्या दोघीचा एकमेकांशी काहीच संपर्क नव्हता. केतकीने तिला बरेच सोशल मीडिया वर शोधण्याचा प्रयत्न केला. पण तिला कुठेच तिचा ठावठिकाणा सापडला नाही. आज अचानक तिच्या समोर ती येऊन उभी राहिली होती. आणि हॉस्टेल वर दोघीचा चालनारा खेळ ही त्यांनी काही क्षणापूर्वी अनुभवला होता.
"तु तुझ्या नवऱ्या आणि मुलांसोबत आहेस हे सांगितलं नाहीस मला …केतकी रागातच नेहा ला म्हणाली.
"अग तुला सांगणार च होते …पण तु मला बोलूच दिल नाहीस... नेहा नाटकी स्वरूपात हसत म्हणाली.
"हो ..का ..तु माझ्या मागुन आलीस आणि …..केतकी बोलता बोलता थांबली आणि मंदार कडे बघिलतल.
"हाय …सॉरी हा ..मघाशी आपली भेट झाली तेव्हा . मला खरंच माहिती नव्हते. तुम्हीच केतकी सरपोतदार आहेत ते …नेहा तुमच्या बद्दल बरंच बोलत असते.. मंदार बाळा ला खेळवत केतकी ला म्हणाला.
"मला पण नव्हत माहिती तुम्ही नेहाचे मिस्टर आहात ते…नेहा नेहमीच मला अशी सरप्राइज देत असते. केतकी नेहा कडे पाहत म्हणाली.